करिना आलियाची चाहती 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

करिना कपूर-खान जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते नाहीतर उगाचच कुठल्याही गोष्टीवर आपलं मत प्रदर्शित करत नाही. अलीकडेच करिनाने प्रांजळपणे ती आलिया भट्टची चाहती आहे असं म्हटलं. नायिकांची मैत्री किंवा नायिकांनी एकमेकांची स्तुती करणं याचं प्रमाण बॉलीवूडमध्ये कमीच आहे. त्यामुळे असं कोणी स्तुती करू लागलं की त्याची चर्चा होते आणि आता तर खुद्द करिनाने आलियाचं कौतुक केलंय. मागे एका कार्यक्रमात करिना असं म्हणाली होती की, "जब वी मेट'मधली गीत माझ्याशिवाय कोणी दुसरं साकारू शकेल तर ती आलिया आहे. तेव्हाही सर्वांना आश्‍चर्य वाटलं होतं. सध्या करिनाप्रमाणेच आलियाचाही खास एक वेगळा चाहता वर्ग आहे.

करिना कपूर-खान जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते नाहीतर उगाचच कुठल्याही गोष्टीवर आपलं मत प्रदर्शित करत नाही. अलीकडेच करिनाने प्रांजळपणे ती आलिया भट्टची चाहती आहे असं म्हटलं. नायिकांची मैत्री किंवा नायिकांनी एकमेकांची स्तुती करणं याचं प्रमाण बॉलीवूडमध्ये कमीच आहे. त्यामुळे असं कोणी स्तुती करू लागलं की त्याची चर्चा होते आणि आता तर खुद्द करिनाने आलियाचं कौतुक केलंय. मागे एका कार्यक्रमात करिना असं म्हणाली होती की, "जब वी मेट'मधली गीत माझ्याशिवाय कोणी दुसरं साकारू शकेल तर ती आलिया आहे. तेव्हाही सर्वांना आश्‍चर्य वाटलं होतं. सध्या करिनाप्रमाणेच आलियाचाही खास एक वेगळा चाहता वर्ग आहे. "हायवे' सिनेमापासून ते "बद्रीनाथ की दुल्हनिया'पर्यंतचा तिचा प्रवास अनेकांना थक्क करतो आणि समीक्षकांनाही तिची दखल घ्यायला लावतो. अशा वेळी करिनालाही तिचं कौतुक करावंसं वाटणं साहजिकच आहे. करिना असं म्हणते की इतक्‍या कमी वयात आलियाने जे यश मिळवलंय, त्यामुळे ती अनेकांची प्रेरणा झाली आहे. तिचा निखळ अभिनय मला भावतो. तिला अभिनय करताना पाहण्यातही सुख आहे. करिना आणि आलियाचे सूर यापुढेही जुळलेले राहावेत. 
संकलन : भक्ती परब  
 

Web Title: karina aalias fan