करिना-करण पुन्हा एकत्र? 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

करिना कपूर मागच्या वर्षी "वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होती; पण काही कारणास्तव त्याला उशीर झाला. आता या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टअखेरीस सुरू होणार आहे.

सध्या बेबोकडे "वीरे दी वेडिंग' हाच एक चित्रपट आहे; पण करण जोहरच्या पुढच्या चित्रपटात करिना काम करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. करण आणि करिनाने या आधी "कभी खुशी कभी गम', "एक मै और एक तू', "कुर्बान', "गोरी तेरे प्यार मै', "वुई आर फॅमिली' आदी चित्रपटांत काम केलंय.

करणबरोबरचा हा चित्रपट एक हलकाफुलका चित्रपट असणार आहे. या चित्रपटात करिना एक हटके भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. नुकतीच करिनाने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि लवकरच ती हा चित्रपट साईन करणार असल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. करिनाने हा चित्रपट स्वीकारला तर बऱ्याच काळानंतर आपल्याला करिना आणि करण एकत्र काम करताना दिसतील.  

Web Title: Karina-Karan together again?