सलमान करिश्‍माचा कॅमिओ 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

सलमान खानची दुहेरी भूमिका असलेला "जुडवा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा रिमेक "जुडवा 2' येत असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. या चित्रपटात वरुण धवनची मुख्य भूमिका आहे, हेही निश्‍चित झालंय. पण आता चित्रपटाचे निर्माते साजिद नडियावाला यांनी "जुडवा 2' मध्ये सलमान खान आणि करिश्‍मा कपूर यांचा स्पेशल ऍपिअरन्स असेल, अशी माहिती दिली. ते म्हणाले, "सलमान आणि करिश्‍माला या चित्रपटाचा हिस्सा होण्याची इच्छा होती. कारण मूळ चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका केल्यात. त्यामुळे सलमान आणि करिश्‍माचा या चित्रपटात स्पेशल ऍपिअरन्स असणार आहे.

सलमान खानची दुहेरी भूमिका असलेला "जुडवा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा रिमेक "जुडवा 2' येत असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. या चित्रपटात वरुण धवनची मुख्य भूमिका आहे, हेही निश्‍चित झालंय. पण आता चित्रपटाचे निर्माते साजिद नडियावाला यांनी "जुडवा 2' मध्ये सलमान खान आणि करिश्‍मा कपूर यांचा स्पेशल ऍपिअरन्स असेल, अशी माहिती दिली. ते म्हणाले, "सलमान आणि करिश्‍माला या चित्रपटाचा हिस्सा होण्याची इच्छा होती. कारण मूळ चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका केल्यात. त्यामुळे सलमान आणि करिश्‍माचा या चित्रपटात स्पेशल ऍपिअरन्स असणार आहे. त्या दोघांना कोणतीही खास भूमिका दिली नाहीये. पण या चित्रपटात ते दोघे असणार आहेत', असं साजिद नाडियावाला यांनी स्पष्ट केलंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेव्हिड धवन करत आहेत; तर वरुणचा या चित्रपटात डबल रोल असणार आहे. त्याच्याबरोबर जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: karishma kapoor and salman khan