'तुझ्यापेक्षाही तुझी मुलगी भारी!' करिश्माच्या मुलीचं नेटकऱ्यांना भारी कौतूक | Karishma Kapoor Daughter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karishma Kapoor Daughter Samaira Kiaan son viral photo

Karishma Kapoor Daughter : 'तुझ्यापेक्षाही तुझी मुलगी भारी!' करिश्माच्या मुलीचं नेटकऱ्यांना भारी कौतूक

Karishma Kapoor Daughter Samaira Kiaan son viral photo : बॉलीवूडमध्ये करिश्मा कपूरनं दीड दशक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं. तिचा डान्स, अभिनय आणि तिचं सौंदर्य यावर चाहते फिदा होते. ९० च्या दशकामध्ये करिश्मानं वेगळी ओळख निर्माण केली होती. आता ती तिच्या लेकीमुळे चर्चेत आली आहे.

करिश्मा भलेही तिच्या अॅक्टिंगमुळे प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय असेल मात्र बऱ्याचदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकांच्या गप्पांचा विषय होती. बॉलीवूडमधील रागीट आणि परखड व्यक्तिमत्वाची अभिनेत्री म्हणून करिश्माकडे पाहिलं गेलं. दरम्यानच्या काळात करिश्मानं मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. फोटोग्राफर्सला करिश्माच्या फॅमिली फोटो मिळाला आणि पुन्हा एका चर्चेला सुरुवात झाली आहे.

Also Read - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की

करिश्मा कपूर आणि तिची मुलगी समायरा कपूर, मुलगा कियान कपूर यांचे फोटो इंस्टावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस् करायला सुरुवात केली आहे. त्यापैकी एकानं तर करिश्माला थेट तिच्या मुलीवरुन प्रतिक्रिया दिली असून त्यामध्ये करिश्मा तुझ्यापेक्षाही समायरा सुंदर आहे. अशा शब्दांत तिचं कौतूक केलं आहे.

हेही वाचा: Pathaan Row : 'बेशरम कुठले? आमचं गाणं चोरलं!' पाकिस्तानी गायकाचा शाहरुखला दणका

बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटी किड्सची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यामध्ये करिना सैफची मुलं, शाहरुखची मुलं, यांची गोष्ट वेगळीच. यासगळ्यात करिश्माच्या मुलीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अद्याप करिश्माच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये येण्याचा विचार केला नसला तरी भविष्यामध्ये ते मोठ्या पडद्यावर दिसतील असे करिश्मानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.