करिष्मा तन्ना हॉरर मालिकेत दिसणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

एकता या मालिकेत कलात्मकदृष्टया गुंतली आहे. तिला वाटले की गौरीची भूमिका करिष्मा तन्ना अधिक चांगल्याप्रकारे साकारू शकेल.

‘कयामत की रात’ या हॉरर मालिकेत अनेक नावाजलेले कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. अनेक दाक्षिणात्य चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री अस्मिता सूद या मालिकेची नायिका गौरीची भूमिका साकारण्यासाठी जवळपास निश्‍चित केली होती. तिच्यासोबत नायकाच्या रूपात विवेक दहिया दिसणार आहे. 
मात्र या मालिकेचे शेवटचे काम करता-करता अस्मिताच्या जागी करिष्मा तन्ना यामध्ये नायिका बनली आहे.

quayamat ki raat

एकता या मालिकेत कलात्मकदृष्टया गुंतली आहे. तिला वाटले की गौरीची भूमिका करिष्मा तन्ना अधिक चांगल्याप्रकारे साकारू शकेल. एकता आणि करिष्मा या चांगल्या मैत्रिणी असून, करिष्माच्या सुरवातीच्या दिवसांपासून ही मैत्री आहे. अर्थातच त्यामुळे करिष्माला एकताने मुख्य भूमिकेची संधी दिली.

Web Title: karishma tanna in horror serial