उतावळा नवरा..! सिड-कियारानंतर आता Kartik Aaryan चढणार बोहल्यावर.. स्वत:च केली घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

उतावळा नवरा..! सिड-कियारानंतर आता Kartik Aaryan चढणार बोहल्यावर.. स्वत:च केली घोषणा

सध्या मनोरजंन विश्वात कलाकारांना लगीन घाई लागली आहे. आधी आलिया नंतर आथिया त्यानंतर कियारा आणि नुकतच चंकी पाडेच्या मुलीचंही लग्न उकरलं आहे. आता क्रिती सेनन आणि तमन्नाच्या लग्नाच्याही बातम्या बऱ्याच चर्चेत होत्या. मात्र त्यातच बॉलिवुडचा मोस्ट वॉनेन्ट मुंडा म्हणजेच कार्तिक आर्यनही लग्न बंधानात अडकणार असल्याचे संकेत त्याने स्वत:चं दिले आहेत.

कार्तिक आर्यनची सध्या हिंदी चित्रपटसृष्टीचा भलतिच हवा आहे. मुलींचा तर तो क्रशच आहे. 'भूल भुलैया 2' सुपरहिट ठरल्यानंतर कार्तिकचं नशीब चांगलचं जोरावर आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. आता बॉलिवुडमधील सगळे कलाकार सिंगलपासून मिंगल होत असल्याने कार्तिकलाही राहवत नाही आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक झी सिने अवॉर्डच्या मंचावर ढोल-ताशा वाजवत एंट्री करतो

यानंतर कार्तिक म्हणतो, 'बघा, बॉलीवूडमध्ये एकामागून एक सर्वांचेच बँड वाजत आहेत, सर्व घोड्यावर चढत आहेत, सर्वांच्याच विकेट पडत आहेत. मात्र अद्याप एक विकेट पडली नाही. ऐलेजिबल सिंगल क्लबमध्ये कोण उरले आहे? अर्थात मीच, पण आता हवामान बदलत आहे, हा सक्त माणूसही वितळत आहे. लग्नाचे लाडू खाऊन पहावे असं वाटतं आहे.

मी प्यार का पंचनामा तर केला आहे, आता लग्नाचाही पंचनामा करतो. त्यामुळे या स्टेजवर तुम्हा सर्वांना साक्षीदार मानून आज मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी देऊ इच्छिते की मी लग्न करणार आहे. असं म्हणतं त्याने त्याच्या लग्नाची जाहिरपणे घोषणा केली आहे.

यावर त्याच्यासमोर बसलेले सर्व कलाकार जोरजोरात हसु लागतात. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असुन चाहतेही त्याच्या या निर्णयावर खुप आंनदित आहे. ते देखील या क्षणाची खुप आतुरतेने वाट पहात असल्याचं बोलत आहेत. तर काहींनी कार्तिकला क्रिती सेननसोबत लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे.