
Kartik Aaryan: 'रातीला मला झोपच येईना', कार्तिकची रात्रीची झोप कोणी उडवली?
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. तो मुलींचा क्रश बनला आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या छोट्या करिअरमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी नुकतिच रिलिज झाली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवणी दिसणार आहे. दोघंही या चित्रपटासाठी खुप उत्सुक आहेत. या चित्रपटाती कार्तिकच्या भुमिकेला प्रेक्षकांचा खुपच प्रतिसाद मिळाला आहे.
आता कार्तिक 'सत्यप्रेम की कथा 'बद्दल इतका उत्साहित आहे की त्यामुळे त्याची आजकाल झोप उडाली आहे. सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यन ने चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
जो शेयर केल्यानंतर लगेचच व्हायरल झाला. या फोटोत चित्रपटाची टिम खुप आनंदी दिसत होती. मात्र कार्तिकच्या या पोस्टच्या कॅप्शनने त्याच्या चाहत्याचं लक्ष वेधलं.
कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काल रात्री अस्वस्थतेमुळे तो झोपू शकला नाही आणि आज झालेल्या आनंदमुळे जो खुपच आहे...'
रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने या चित्रपटासाठी 25 कोटी रुपये फी घेतली आहे. 'भूल भुलैया 2'च्या यशानंतर कार्तिकने त्याची फी वाढवली असल्याचे बोलले जात आहे.
एवढेच नाही तर कियाराने या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये घेतले असल्याच्या चर्चा आहे. मात्र अद्याप त्यांनी या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही.
कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सत्यप्रेम की कथा' व्यतिरिक्त तो 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कार्तिक आर्यन शेवटचा 'शेहजादा' चित्रपटात दिसला होता.