...तर मी माझं मानधन कपात करायला तयार, कार्तिक आर्यनने दाखवला समजुतदारपणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कार्तिकने आपलं मानधन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मानधन कमी करुन जर चित्रपटसृष्टीला मदत होत असेल तर मी ते करायला तयार आहे असे कार्तिकने स्वतः नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.

मुंबई ः लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीला कोटींच नुकसान झालं आहे. बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण रखडले आहे. तसेच काही बिग बजेट चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम ठप्प झाल्याने सारं गणितच कोलमडलं आहे. त्याशिवाय चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आता हे चक्र कधी थांबणार हा मोठा प्रश्नच आहे. चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांवरच आता पावसाळा देखील येऊन ठेपला आहे. त्यामुळे करोडो रुपयांचे उभारलेले सेट देखील जमीनदोस्त करण्याची वेळ चित्रपटांच्या निर्मात्यांवर आली आहे. 

हे ही वाचा - टीव्ही अभिनेता आशिष रॉयला उपचारासाठी हवी आर्थिक मदत

करोडो रुपयांचे सेट जमीनदोस्त केल्यानंतर पुन्हा नव्याने हे सेट उभारायला त्याच्या दुप्पट खर्च लागणार आहे. हे सारं चित्र फार भीषण आहे. सध्या चित्रपटसृष्टी आर्थिक संकटात सापडली असताना अभिनेता कार्तिक आर्यनने चांगला समजुतदारपणा दाखवला आहे. कार्तिकने आपलं मानधन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मानधन कमी करुन जर चित्रपटसृष्टीला मदत होत असेल तर मी ते करायला तयार आहे असे कार्तिकने स्वतः नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. 

Exclusive: Kartik Aaryan penned his viral monologue on coronavirus ...

कार्तिक म्हणतो, 'सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चित्रपटसृष्टीचं खूप नुकसान झालं आहे. त्यासाठी मी मानधन कमी घेऊन त्याचा फायदा चित्रपटसृष्टीला होत असेल तर मी ते करायला तयार आहे. मी माझ्या परिने शक्य तेवढी मदत करेन. आणि प्रत्येकाने मदत केली पाहिजे. निर्मात्यांचे नुकसान होऊ नये शिवाय सेटवर सतत काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या जाऊ नयेत असे मला मनापासून वाटतं. जर मानधन कमी करुन या संकटामध्ये काही मदत होत असेल तर मी कधीही तयार आहे.

खरं तर प्रत्येकाने यासाठी तयार राहिलं पाहिजे.'खरं तर कार्तिकचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. येत्या काळात चित्रपटसृष्टीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशामध्ये कलाकारांना जर मानधन कमी करावं लागत असेल तर त्याची तयारी त्यांनी ठेवावी हे कार्तिकचं स्पष्ट मत आहे. कोरोना विषाणूबाबात जनजागृती निर्माण व्हावी म्हणून लॉकडाऊनमध्ये कार्तिक वेगवेगळे प्रयोग देखील करत आहे. व्हिडिओ, पोस्टच्या माध्ममातून तो ही जनजागृती करत आहे. 

kartik aaryan ready to take pay cut if it helps the industry


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kartik aaryan ready to take pay cut if it helps the industry