कार्तिक आर्यनची हकालपट्टी, आयुषमान खुराणाची एंट्री

आनंद एल राय (director anand l rai) यांनी असे म्हटले आहे की,
kartik aaryan
kartik aaryanTeam esakal

मुंबई - प्रसिध्द निर्माते आनंद एल (director anand l rai ) यांनी बॉलीवूडचा (bollywood) सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनवर (kartik aaryan) जे आरोप करण्यात आले आहे ते चूकीचे आहे. असे म्हटले आहे. त्यामुळे आता कार्तिक आर्यनचे चाहते गोंधळात पडले आहे. नेमकं काय झाले आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवू़डचा प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं कार्तिक आर्यनला आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून घरचा रस्ता दाखवला होता. (kartik aaryan removed ayushman khurana signed director anand l rai broke the silence)

आनंद एल राय (director anand l rai) यांनी असे म्हटले आहे की, आमच्या प्रॉडक्शन हाऊसमधून कार्तिकला बाहेर काढण्यात आले असे म्हणणे चूकीचे आहे. सध्या मीडियामध्ये ज्या बातम्या पसरल्या आहेत त्यावरुन असे दिसून आले आहे. मात्र त्याबाबत सांगायचे झाल्यास, आम्ही त्याला काही बाहेर काढलेले नाही. ते खोटं आहे. आनंद राय यांनी कार्तिक आर्यनला त्यांच्या चित्रपटातून बाहेर काढले अशी बातमी व्हायरल झाली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद राय हे तमिळ मुव्ही कल्याणा संम्याल सदाम (Kalayana Samayal Saadam) नावाच्या चित्रपटाचा रिमेक तयार करत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला निवडले होते. मात्र अचानक तो त्या चित्रपटात काम करत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. त्याच्या जागी अभिनेता आयुषमान खुराणाही काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर राय यांनीही या चित्रपटाबाबत आयुषमानशी बोलणे सुरु असल्याचे सांगितले.

kartik aaryan
फिटनेस फ्रिक अमृताचा हॉट अंदाज
kartik aaryan
'बाबांचे हात-पाय बांधून ठेवले होते'; संभावनाने रुग्णालयाला पाठवली नोटीस

ज्या चित्रपटावर राय हिंदीत रिमेक तयार करणार आहे त्याविषयी अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या दोन्ही अभिनेत्यांपैकी कोणाची वर्णी त्या चित्रपटात लागणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यापूर्वी करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात काही कारणामुळे वाद निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com