Tu Jhoothi Main Makkaar : डबल धमाल! रणबीर-श्रद्धाच्या 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये या हिरोचा कॅमियो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tu Jhoothi Main Makkaar

Tu Jhoothi Main Makkaar : डबल धमाल! रणबीर-श्रद्धाच्या 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये या हिरोचा कॅमियो

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर अभिनेता आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

त्याचवेळी, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट देखील थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, कार्तिक आणि रणबीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार असल्याचे वृत्त आहे.

रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आता रणबीर आणि श्रद्धाचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्याची छोटी भूमिका असणार असल्याचे बोलले जात आहे.

हा चित्रपट लव रंजनने दिग्दर्शित केला असून तो कार्तिकचा चांगला मित्र आहे. अशा परिस्थितीत त्यांनी अभिनेत्याला आपल्या चित्रपटाचा भाग बनवले आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीत लव रंजन आणि कार्तिक आर्यन यांच्यात चांगली मैत्री आहे. कार्तिक आणि लव रंजन यांचा खूप अगोदर पासून संबंध आहे. दोघांनी 'सोनू के टीटू की स्वीटी', 'आकाश वाणी' आणि 'प्यार का पंचनामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

दुसरीकडे, 'तू झुठी मैं मक्कार' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी दिग्दर्शित केला आहे. होळीच्या मुहूर्तावर तो ८ मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' नंतर हा या वर्षातील दुसरा मोठा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबतच या चित्रपटातील स्टार कास्ट, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर हे देखील सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर आणि श्रद्धा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.