Kartik Aaryan च्या आईची कॅन्सर शी झुंज यशस्वी, अभिनेत्यानं पोस्ट शेयर करत सांगितलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan, Kartik Aaryan news, Kartik Aaryan movies, Kartik Aaryan mother, Kartik Aaryan mother cancer

Kartik Aaryan च्या आईची कॅन्सर शी झुंज यशस्वी, अभिनेत्यानं पोस्ट शेयर करत सांगितलं...

Kartik Aaryan Mother News: कोणाही मुलासाठी आईचं आरोग्य सर्वात महत्वाचं असतं. आपली आई निरोगी, सुदृढ राहावी अशी कोणत्याही मुलाची इच्छा असते.

अशातच आईला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असेल तर मात्र मुलाला आईची सतत काळजी लागून राहते.

अशीच काहीशी गोष्ट घडली अभिनेता कार्तिक आर्यनच्या बाबतीत. कार्तिक आर्यनच्या आईला कॅन्सरसारखा गंभीर आजार झालेला. पण आता कार्तिकच्या आईने कॅन्सरवर मात केलीय.

(Kartik Aaryan's mother beats cancer, emotional post for actor's mother goes viral)

कार्तिक आर्यनने आईसोबतचा गोड फोटो पोस्ट करुन लिहिलंय की... 'काही काळापूर्वी या महिन्यात कॅन्सरसारखा आजार गुप्तपणे आमच्या घरात शिरला आणि आमचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला."

कार्तिक आर्यनने पुढे लिहितो.. "आम्ही हताश आणि निराश तसेच असहाय होतो. पण माझ्या आईची इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याच्या सवयीमुळे आम्ही मोठ्या धैर्याने पुढे गेलो आणि अंधारात विजय मिळवला आणि ही लढाई आम्हाला जिंकायची होती.

शेवटी या परिस्थितीने आम्हाला काय शिकवले आहे आणि आम्ही दररोज जे शिकत आहोत ते म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि सपोर्टपेक्षा चांगले काहीही नाही.'#SuperHero #CancerWarrior" अशी पोस्ट कार्तिकने त्याच्या आईसाठी लिहिली आहे.

याआधीही कार्तिक आर्यनने त्याच्या आईसोबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक आपल्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलताना दिसत होता. कार्तिकची आई ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती.

व्हिडिओमध्ये आपल्या आईबद्दल बोलताना कार्तिक खूप भावूक झाला होता. आता आईने कॅन्सरवर मात केल्याने कार्तिकच्या आनंदाला नक्कीच उधाण आलं असेल यात शंका नाही.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर तो 'सत्यप्रेम की कथा' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.

याशिवाय 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कार्तिक आर्यन शेवटचा 'शेहजादा' चित्रपटात दिसला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी केली.