ब्रेकअपवर कार्तिकने दिली अशी रिअ‍ॅक्शन, सारा झाली शॉक

Kartik Aryan spoke about breakup on Indian Idol show
Kartik Aryan spoke about breakup on Indian Idol show

मुंबई : बॉलिवूडमध्ये लव्ह लाइफ हा अगदी चर्चेचा विषय आहे. ब्रेकअप, रिलेशनशिप, अफेअर आणि लग्न यांचा सिलसिला तर सुरुच असतो. बॉलिवूडमधील एक कपल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे दोघं बी-टाऊनमधले क्युट कपल आहे. पण, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली. कार्तिक आर्यनने ब्रेकअपविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची प्रतिक्रिया पाहून साराही शॉक झाली. जाणून घ्या नक्की कार्तिक नक्की काय बोलला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 #saraalikhan #kartikaaryan

A post shared by sara&kartik (@sarakartik_fp) on

साराने 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या शोमध्ये रिलेशनशिपविषयी बोलली होती. त्यावेळी कार्तिक तिवा आवडत असल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर अनेकदा सारा आणि कार्तिकला एकत्र स्पॉट करण्यात आले. तेव्हाच त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले. पण, सारा आणि कार्तिक या दोघांनी हे अधिकृतपणे मान्य केले नाही. 

हे दोघं लवकरच 'लव्ह आज कल' या सिनेमातून एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे आणि त्यासाठीच सारा आणि कार्तिक 'इंडियन आयडॉल' या शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान या शोमधली कार्तिकचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणने या दोघांना एक टास्क दिले होते. ज्यामध्ये सारा आणि कार्तिकला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Will their chemistry ignite the box office? Wait n watch #saraalikhan #kartikaaryan  #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आदित्यने विचारले की, ''यावेळी ब्रेकअपल झाल्यास तुमच्यापैकी कोण त्यानंतरही मैत्री ठेवू शकते?''. त्यावर सारा म्हणाली की ती ब्रेकअप नंतरही मैत्री ठेवू शकते. पण, कार्तिकने हटके उत्तर दिलं ज्यामुऴे साराही शॉक झाली. कार्तिकने मैत्री ठेवण्यासाठी नकार दिला आणि तो म्हणाला, '' आना है तो पूरी तरह आना नाही तो आना ही नही ". खरंतर हा डायलॉग 'लव्ह आज कल' या सिनेमातला आहे. तो कार्तिकने अगदी योग्य पद्धतीने वापरला आहे. 

सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेला पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com