महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेड लावणारी कार्तिकी अडकणार लग्नाच्या बेडीत

विलास काटे
मंगळवार, 7 जुलै 2020

पुण्याजवळील वडगाव धायरी येथील रोनित पिसे यांच्यासोबत नुकताच गंधाचा कार्यक्रम झाला असून २६ जुलैला साखरपूडा होणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अगदी घरच्या घरी सर्व नियम पाळून होणार आहे.

आळंदी : 'सारेपगमप लिटील चॅम्प' विजेती महाराष्ट्राची महागायिका म्हणून परिचित असलेल्या कार्तिकी गायकवाडचा नुकताच साक्षीगंधाचा कार्यक्रम झाला असून २६ जुलैला साखरपुडा आणि डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे. ''लिटील चॅम्प'च्या कार्यक्रमामुळे कार्तिकी प्रकाशझोतात आली. साक्षीगंध होवून आता लग्नाचा बेडीत अडकणार असल्याने कार्तिकी पुन्हा चर्चेत आली. 

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

कार्तिकी गायकवाड वारकरी संप्रदायातील असून आळंदीत तिने वडिलांचा सांप्रदायिक संगिताचा वारसा पुढे चालू ठेवला. वडिल कल्याण गायकवाड स्वता भजनसम्राट असून संगिताबाबत सखोल ज्ञान आहे. त्यांची स्वत:ची संगीत शाळा आळंदीत आहे. कार्तिकीही त्यांचेकडेच बालपणापासून गायनाचा सराव करत होती. मात्र 'लिटील चॅम्प'च्या कार्यक्रमात सहभागी होवून विजेतेपद मिळवल्याने कार्तिकीने स्वत:ची ओळख निर्माण केली असून आता संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जावू लागली. तिच्यामागे संगीत क्षेत्राचे वलय निर्माण झाले. 'स्टेज शो'सोबत तिला चित्रपटात गायनाच्या संधीही मिळत गेल्या. तिच्याबरोबरच तिचा छोटा भाऊ कौस्तुभही उत्तम गायक असून 'बॉईज'सारख्या मराठी चित्रापटातून पार्श्वगायन केले. संपूर्ण घरच गायन क्षेत्रात आहे. वारकरी संप्रदायातील अभंग, गवळणीच्या अनेक कॅसेटस गायकवाड कुटूंबाच्या आवाजातील आहेत. यामुळे आळंदीत वारकरी सांप्रदायिक आणि संगीत क्षेत्रात गायकवाड कुटूंबाचा दबदबा आहे. संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. मात्र, नुकतेच कार्तिकीने विवाहाचा निर्णय घेतला आणि पुन्हा तिच्याबाबत चर्चा सुरू झाली. साक्षिगंधाचा कार्यक्रम झाल्याने कार्तिकी आता आयुष्याच्या नव्या प्रवासास सुरूवात करणार आहे.

Image may contain: 3 people, people standing

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्याजवळील वडगाव धायरी येथील रोनित पिसे यांच्यासोबत नुकताच गंधाचा कार्यक्रम झाला असून २६ जुलैला साखरपूडा होणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अगदी घरच्या घरी सर्व नियम पाळून होणार आहे. रोनितचे आईवडिलांची कार्तिकीचे वडिल कल्याण गायकवाड यांच्यासोबत अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. रोनित यांच्या मामांना संगीत शिकवण्यासाठी कल्याण गायकवाड जात होते. तेव्हापासून दोन्ही कुटूंबाचे एकमेकांशी स्नेहाचे संबंध आहे. रोनित स्वत: उत्तम तबला वाजवितो. 'मेकॅनिकल इंजिनिअर' असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. कार्तिकीने संगीत विषयात 'एमए' केले आहे. अचानक कार्तिकीच्या साक्षिगंधाची चर्चा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र दोघांचेही ''अरॅज मॅरेज' आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kartiki Gailwad will Get Married with Ronit Pise