मृतदेहासोबत प्रवास करणारा 'कारवां'; ट्रेलर रिलिज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सिनेमाचा विषय गंभीर आहे. पण इरफानने सिनेमातील काही प्रसंगात मध्येच केलेले एखादे वाक्य धमाल उडवणारे आहे.

इरफान खानची मुख्य भुमिका असलेला 'कारवां' येत्या 3 ऑगस्टला रिलिज होणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. एका मृतदेहाच्या शोधात दुसऱ्या एका मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या तिघांची ही कथा आहे. 

नवोदित अभिनेता दलकीर सलमान आणि 'कपसाँग गर्ल' मिथिला पालकर सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. इरफान, दलकीर आणि मिथिला हे तिघंही आयुष्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असतात. सिनेमाचा विषय गंभीर आहे. पण इरफानने सिनेमातील काही प्रसंगात मध्येच केलेले एखादे वाक्य धमाल उडवणारे आहे. 'कारवां' रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रॉडक्शन निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे.

कृती खरबंदा, सिध्दार्थ मेनन यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. अनिल कपूर आणि एैश्वर्या राय बच्चन यांचा 'फन्ने खान' हा सिनेमाही 3 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तेव्हा 'कारवां' आणि 'फन्ने खान' यांच्यात टक्कर होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karwaan Trailer Release