
Kashmera Shah: 'इतकी कशाला घ्यायची', कश्मीराचं आधी नवऱ्याला किस अन् नंतर...नेटकऱ्यांनी सगळी नशाच उतरवली
बिग बॉस 16 चा सिझन जरी संपला असला तरी घरातील स्पर्धकांच्या पार्टीज काही संपत नाही आहे. प्रथम फराह खानने पार्टी दिली, त्यानंतर शेखर सुमन आणि आता आणखी एक कार्यक्रम झाला. ज्यामध्ये शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, साजिद खान आणि सुंबुल यांच्यासह बिग बॉसचे सर्व स्टार्स दिसले.
मात्र या पार्टीत या स्पर्धकांची नव्हे तर कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांचीच चर्चा जास्त रंगली.
हे दोघं पापाराझींसमोर रोमँटिक अंदाजात दिसले. कश्मिरा शाहने पापाराझींची भेट घेतली. यादरम्यान तिने ब्लॅक आउटफिटमध्ये अतरंगी आणि बोल्ड पोज देण्यास सुरुवात केली. यानंतर तिला सांभाळायला पती कृष्णा अभिषेक आला.
त्यानंतर कश्मिराने कृष्णाला कॅमेऱ्यासमोर खेचले आणि त्याच्या ओठांवर चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्याचे हे फोटो सेशन सुरु असतांनाच प्रियांका चहर चौधरीही तिथं आली. त्यांनतर तर कश्मिराने तिलाही किस केलं. नंतर तिघांनीही एकत्र पोज दिली.

काश्मिराचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती नक्कीच नशेत असेल असा अंदाजही बांधला जात आहे. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरीही या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी तिला चांगलचं ट्रोल केलं आहे.
त्याचवेळी एका यूजरने रागात म्हटलयं की, 'कश्मिरा नशेत आहे', तर दुसऱ्याने कृष्णाला त्याच्या पत्नीला सांभाळून घरी घेवून जाण्याचा सल्ला दिला आहे. एकानं लिहिलयं की 'पतीला किस केलंस ठिक आहे, पण प्रियांकालाही तू किस करतेय’
तर काहींनी प्रियंकाला नवरा बायकोच्या व्हिडिओत येण्याची काय गरज होती असं म्हणतं फटकारलं आहे.