अभिनेत्री केट विन्स्लेटचं आॅस्कर.. एक टाॅयलेट कथा!!

गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

केट विन्स्लेट ही नायिका माहीत नाही असा हाॅलिवूड्प्रेमी सापडणं तसं कठीण आहे. कारण स्टिवन स्पिलबर्गच्या टायटॅनिकने तिला वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही. आता पुन्हा तिच्या नावाची चर्चा होण्याचं कारण असं, की नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत केटने एक गौप्यस्फोट केलाय. तिला द रीडरसाठी मिळालेलं आॅस्कर ती ठेवते चक्क तिच्या टाॅयलेटमध्ये. आणि यापूर्वी तिने ही काॅपी केली आहे ती एका अमेरिकन अभिनेत्रीची. 

मुंबई : केट विन्स्लेट ही नायिका माहीत नाही असा हाॅलिवूड्प्रेमी सापडणं तसं कठीण आहे. कारण जेम्स कॅमरूनच्या टायटॅनिकने तिला वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही. आता पुन्हा तिच्या नावाची चर्चा होण्याचं कारण असं, की नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत केटने एक गौप्यस्फोट केलाय. तिला द रीडरसाठी मिळालेलं आॅस्कर ती ठेवते चक्क तिच्या टाॅयलेटमध्ये. आणि यापूर्वी तिने ही काॅपी केली आहे ती एका अमेरिकन अभिनेत्रीची. 

अभिनेत्री इमा थाॅमसनचा आदर्श घेत केटने हे पाऊल उचललं आहे. ती म्हणते, आपल्या सर्वात आवडत्या गोष्टी ज्या असतात त्यासोबत आपल्याला एकांत हवा असतो. शिवाय त्या रोज आपल्या नजरेसमोर राहतात. मला ही आयडीया नव्हती. पण मी काही वर्षांपूर्वी इमा थाॅमसन यांना भेटायला गेले होते. त्यांनी आपलं आॅस्कर टाॅयलेटमध्ये मागच्या बाजूला ठेवलं होतं. मी ते पाहिलं. हातात घेतलं आणि मला नवं बळ मिळालं. कारण त्याक्षणी मी एकटी होते. पुढे काही वर्षांनी मला आॅस्करची बाहुली मिळाली. मग मीही ती माझ्या लूमध्ये ठेवली आहे, असं केटने सांगितलं. 

आता 41 वर्षांची ही अभिनेत्री हाॅलिवूडमध्ये स्थिरावली आहे. टाॅयलेटही गोष्ट अशी आहे, की आपण सर्वांना आपल्या खासगी टाॅयलेटमध्ये प्रवेश देत नाही. शिवाय तो दिला तर त्याला तिथे एकांत मिळतो. ते क्षण कमालीचे सुखावणारे असतात असंही ती सांगते. 

 

 

Web Title: kate winslet keep her oscar in toilet esakal news

टॅग्स