महिला दिनी कतरिनानं मानले आईचे आभार; बहिणींच्या आठवणीत झाली नॉस्टॅल्जिक

कतरिना कैफने सोशल मीडियावर बहिणींसोबतचे फोटो शेअर करीत आठवणींना उजाळा दिला.
Katrina Kaif with her Mother And Sisters
Katrina Kaif with her Mother And SistersGoogle

अभिनेत्री कतरिना कैफनं(Katrina Kaif) आज महिला दिनाच्या(Women's Day) निमित्तानं सहा बहिणींचे फोटो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिची बहिण इसाबेलनं देखील बहिणींसोबतचे कितीतरी फोटो तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. आणि महिला दिनाच्या शुभेच्छाही तिनं बहिणींना दिल्या आहेत. कतरिना कैफला तीन मोठ्या आणि तीन लहान बहिणी आहेत. कतरिनाला एक मोठा भाऊ देखील आहे.

सोशल मीडियावर फोटो शेअर करीत कतरिनानं लिहिलं आहे,''एकाच कुटुंबातल्या खूप साऱ्या महिला...आम्ही बहिणी''. कतरिना त्या फोटोत इतर पाच बहिणींमध्ये उभी आहे. आणि हा फोटो पाठमोरा काढलेला आहे. तर कतरिनाची बहिण इसाबेलनं फोटो पोस्ट करीत कॅप्शन दिलंय,''एकत्रितपणे आनंद साजरा करणाऱ्या आणि कठीण परिस्थितीला सुसह्य बनवणाऱ्या महिला,हॅप्पी वूमन्स डे!'' कतरिनाच्या मोठ्या बहिणींची नावं आहेत स्टेफनी टर्कोट,क्रिस्टिन स्पेन्सर,नताशा टर्कोट आणि तीन लहान बहिणी अनुक्रमे मेलिसा टर्कोट,सोनिया टर्कोट आणि इसाबेल.

Katrina Kaif with her Mother And Sisters
महिला दिनी हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

२००९ मध्ये कतरिनानं कुटुंबाविषयी मोठा खुलासा केला होता. ती म्हणाली होती,''माझ्या आईनं आम्हा सात भावंडांना मोठं केलं आहे. माझे आई-वडील विभक्त झाले,तेव्हा आम्ही खूप लहान होतो.तिनं आम्हाला एक चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून खूप कष्ट घेतले. तिनं आम्हाला खूप स्ट्रॉंग बनवलंय. तिनं आम्हाला स्वप्न पहायला शिकवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यायची प्रेरणाही दिली. तिनं इतर पालकांप्रमाणे कधीच आमच्यावर सक्ती केली नाही. आम्ही डॉक्टर,वकील,इंजिनिअर व्हावं म्हणून कधी हट्ट धरला नाही. म्हणून आज आम्ही प्रत्येकजण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहोत''. आज पुन्हा महिला दिनाच्या निमित्तानं कतरिनानं आईचे यासाठी धन्यवाद मानले आहेत.

कतरिना लवकरच 'टायगर ३' मध्ये सलमान खान सोबत दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं राहिलेलं शूटिंग पूर्ण करण्यात कतरिना-सलमान व्यस्त आहेत. हा सिनेमा २१ एप्रिल,२०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ती लवकरच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमातही दिसेल. या सिनेमात तिच्यासोबत प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com