कतरिना कैफने चुकून पोस्ट केला विकी कौशलसोबतचा फोटो, मग लगेचच केला डिलीट

vicky katrina
vicky katrina

मुंबई- गेल्या कित्येक दिवसांपासून कतरिना कैफ आणि विक्की कौशल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांच्या अफेअर्सची सोशल मिडियावर देखील खूप चर्चा आहे. कित्येक ठिकाणी कतरिना आणि विक्की एकत्र दिसून आले आहेत. मात्र या दोघांनी अजुनही त्यांच्या नात्याबद्दल खुलेआम कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शंका आहे की हे दोघं नक्की एकमेकांना डेट करत आहेत की नाही. यादरम्यान कतरिना कैफने एक अशी चूक केली ज्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. 

अभिनेत्री कतरिना कैफने इंस्टाग्राम न्यू इयर २०२१ च्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये कतरिना तिची बहीण इसाबेलसोबत दिसून आली. या फोटोमध्ये कतरिना इसाबेलंच सोबत होत्या मात्र दोघांच्या बॅग्राऊंडमध्ये असलेल्या आरशामध्ये विक्की कौशलचं रिफ्लेक्शन दिसून येत आहे. कतरिनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो तिला तिच्या चुकीची जाणीव होताच तिने हा फोटो डिलीट केला. 

कतरिनाने हा फोटो डिलीट करण्याआधीच चाहत्यांनी तिची ही चूक पकडली. चाहत्यांच्या नजरेतून हा फोटो सूटला नाही त्यांना पाठीमागच्या आरशामध्ये विक्कीची झलक दिसली. पाहता पाहता हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. फोटोमध्ये इजाबेल आणि कतरिना बसून सिक्वेन्सचा गेम खेळताना दिसत आहेत. हे पहिल्यांदाच असं घडत नाहीये जेव्हा विक्की कतरिनाच्या घरी पोहोचला आहे. विक्कीला अनेकदा कतरिनाच्या घरी जाताना पाहिलं गेलं आहे.   

katrina kaif accidently shares a photo with rumored boyfriend vicky kaushal then deleted  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com