
एकीकडे विजयने 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमात काम करण्यास नकार दिला तर दुसरीकडे आमिर खानने आर माधवनसोबत बनत असलेल्या ब्लॉकबास्टर 'विक्रमवेधा' सिनेमाचा रिमेक करण्यास नकार दिला.
मुंबई- बॉलीवूडमध्ये जे काम आमिर खान करु शकला नाही ते काम दिग्दर्शक श्रीराम राघवनने करुन दाखवलं आहे. सगळं काही व्यवस्थित राहिलं तर साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीच्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन श्रीराम करतील आणि त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे विजय सेतुपतिसोबत जी हिरोईन असेल ती म्हणजे कतरिना कैफ. विजय सेतुपतिचा तमिळ सिनेमा 'मास्टर' या शुक्रवारी हिंदीमध्ये मुळ सिनेमासोबतंच रिलीज होत आहे.
हे ही वाचा: विकी कौशलच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज होताच झाला व्हायरल
उत्तर भारतमध्ये हळुहळु चाहतावर्ग निर्माण केलेल्या विजय सेतुपतीच्या हिंदी सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. पहिले आमिर खानने विजय सेतुपतीला हिंदी सिनेमामध्ये आणण्याची जबाबदारी घेतली होती. आणि 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमामध्ये त्याच्याासाठी एक खास भूमिका देखील लिहिली होती. मात्र विजय मनमौजी कलाकार आहे आणि त्याला देखील वाटलं की कलाकारांच्या गर्दीत तो धुमकेतू तर बनून राहणार नाही ना? म्हणून एकीकडे विजयने 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमात काम करण्यास नकार दिला तर दुसरीकडे आमिर खानने आर माधवनसोबत बनत असलेल्या ब्लॉकबास्टर 'विक्रमवेधा' सिनेमाचा रिमेक करण्यास नकार दिला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सेतुपतीकडे तारखेचा खूप तोटा आहे. त्याने पुढच्या दोन ते तीन वर्षांपर्यंत एकानंतर एक प्रोजेक्टचं लाईन अप केलेलं आहे. मात्र त्याला 'एक थी हसीना', 'बदलापूर' आणि 'अंधाधून' सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करणा-या श्रीराम राघवन यांची कथा पसंत पडली आहे. त्याने या सिनेमासाठी होकार देखील दिला आहे. आता केवळ तारखांमुळे अडचण निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम राघवन यांच्या या सिनेमामध्ये काम करण्यासाठी कतरिना कैफने देखील होकार दिला आहे. कतरिनाच्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सुर्यवंशी' या सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे ज्यामध्ये ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'भूत पुलिस'च्या मेकिंगमध्ये देखील बिझी आहे.
सुपरस्टार विजय सेतुपतीचं नवीन वर्ष पोंगलला लोकेश कंगराज दिग्दर्शित 'मारा' या सिनेमाने सुरु होणार आहे. उत्तर भारतातील प्रेक्षकांनी २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'विक्रमवेधा' सिनेमापासून ख-या अर्थाने ओळखायला सुरुवात केली. त्यानंतर '९६', 'पेटा', 'सुपर डिलक्स' सारख्या सिनेमांमधून केवळ तमिळ सिनेप्रेमींमध्येच नाही तर सबटायटलसोबत तमिळ सिनेमे पाहणा-या अन्य भाषिकांमध्येही तो सुपरस्टार बनला.
katrina kaif will star in sriram raghavan next film vijay sethupathi play the leading man