
Katrina-Vicky First Meet Video Viral: समोर आला कतरिना-विकीचा पहिल्या भेटीचा व्हिडीओ..पाहताच अभिनेत्रीला म्हणाला होता..
Katrina-Vicky First Meet Video Viral: विक्की कौशल आणि कतरिना कैफनं 2021 मध्ये अचानक लग्नाचा निर्णय घेत चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं होतं. दोघांच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष होऊन गेलं आणि त्यानंतर अनेकदा ते काही ना काही कारणानं चर्चेत पहायला मिळतात.
पण या दोघांच्या बाबतीत आजही एक उत्सुकता चाहत्यांना आहे की यांची पहिली भेट नेमकी कधी आणि कुठे झाली होती. आता विकी कौशलनं स्वतः याविषयी सांगितलं आहे.
कतरिना कैफ आणि विकी यांची पहिली भेट २०१९ सालात एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. आयुष्मान खुराना सोबत विकी त्या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करत होता आणि त्यादरम्यान त्यानं कतरिनाला भर सोहळ्यात प्रपोज केलं होतं. दोघांच्या लग्नानंतर त्या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता.
कतरिनाला पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर बोलावलं जातं. त्या दरम्यान विकी पहिल्यांदा कतरिनाला म्हणतो की, तो तिचा मोठा चाहता आहे. त्यानंतर थेट पठ्ठ्या म्हणतो,''तू कोणत्यातरी विकी कौशलला शोधून लग्न का करत नाहीस?''.
पुढे विकी म्हणाला होता,''तसाही लग्नाचा सिझन सुरू आहे,तुला देखील वाटत असेल लग्न करावंस तर म्हणून म्हटलं विचारूया''. ज्यावर कतरिना म्हणते,''का?'' आणि मग विकी सलमान खानच्या सिनेमातील गाणं गात थेट विचारतो,''मुझसे शादी करोगी''.
विकीच्या या बोलण्यावर कतरिना मात्र व्हिडीओत क्युट हसताना दिसत आहे. त्या सोहळ्यात सलमान खानही गेस्टमध्ये बसलेला दिसत आहे आणि हे सगळं पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं स्माइलही पाहण्यासारखं होतं.
सध्या विकी कौशल त्याच्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा सिनेमा २ जून रोजी रिलीज होत आहे.
या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान विकीनं त्या पुरस्कार सोहळ्यातील कतरिनासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. आणि म्हटलं की,त्यानं कतरिनाला तेव्हा जे काही म्हटलं होतं तो स्क्रीप्टचा भाग होता. ती स्टेजवर आल्यावर तिला काय म्हणायचं ते सगळं लिहून दिलं होतं. तेव्हा विकी म्हणाला की त्याची कतरिनासोबतची ती पहिलीच भेट होती.