Vicky Kaushal Birthday : अनुराग कश्यपची भेट झाली, आयुष्याचं सोनं झालं! नाहीतर तो आज...

२०१५ मध्ये आलेल्या मसान नावाच्या चित्रपटामध्ये विकी सर्वप्रथम चमकला. त्यातून त्याच्या अभिनयाची ताकदही अनेकांना कळली होती.
Vicky Kaushal Happy Birthday bollywood Actor
Vicky Kaushal Happy Birthday bollywood Actoresakal

Vicky Kaushal Happy Birthday bollywood Actor : बॉलीवूडमध्ये आता स्टार अभिनेता झालेला विकी कौशल याचा बॉलीवूडमधील प्रवास मोठा संघर्षमय आहे. विकीलाही आपण कधी अभिनेता होऊ असे वाटले नव्हते. त्याचे वडील बॉलीवूडमधील प्रसिद्ध फाईट मास्टर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबातून एखाद्या मुलाला जेव्हा बॉलीवूडमध्ये यायचे असेल तर किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना ठाऊक होते.

अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा म्हणून विकी कौशलची तेव्हा ओळख होती. आता विकीनं त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता तो तर आहेच याशिवाय आपल्या अभिनयासाठी देखील विकीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आज विकी कौशलच्या जन्मदिवस. त्याच्या आजवरच्या प्रवासात त्याला अनेक दिग्दर्शकांची साथ लाभली मात्र यासगळ्यात महत्वाचा वाटा होता तो प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपचा.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

१६ मे १९८८ रोजी जन्म झालेल्या विकीला बॉलीवूडमध्ये संधी मिळण्यास फारशा अडचणी आल्या नाहीत असे काहींचे म्हणणे आहे. त्याचे कारण विकीचे वडील. त्यांचे बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. विकीनं गेल्या चार वर्षात जे चित्रपट केले त्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालेले नाही. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सुरुवातीच्या काळात देखील विकीला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.

विकीला जेव्हा अनुराग कश्यप भेटला तेव्हा त्याचे अच्छे दिन सुरु झाले असे अनेक सिनेअभ्यासकांचे म्हणणे आहे. अनुरागनं २०१५ मध्ये बॉम्बे वेलवेट नावाचा चित्रपट केला होता. त्यामध्ये विकीनं जी तुलसी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. ती प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. तेव्हापासून तो अनेक दिग्दर्शकांच्या नजरेत भरला होता.

Vicky Kaushal Happy Birthday bollywood Actor
The Kerala Story : पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी, अमेरिका-कॅनडामध्ये झाला प्रदर्शित!

२०१५ मध्ये आलेल्या मसान नावाच्या चित्रपटामध्ये विकी सर्वप्रथम चमकला. त्यातून त्याच्या अभिनयाची ताकदही अनेकांना कळली होती. हा चित्रपट अनेक विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्येही गाजला होता. त्यात विकीच्या जोडीला रिचा चढ्ढा नावाची अभिनेत्री होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज घेवन यांनी केले होते.

Vicky Kaushal Happy Birthday bollywood Actor
The Kerala Story Banned : 'चित्रपटावर बंदी का घातली याचं उत्तर द्या?' तामिळनाडू, पश्चिम बंगालला सर्वोच्च न्यायालयानं झाडलं, 'तुम्ही तर...'

अनुराग कश्यपनं त्याच्या रमन राघव या चित्रपटासाठी विकीला घेतलं होतं. त्यात नवाझुद्दीन प्रमुख भूमिकेत होता. विकीनं या चित्रपटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. तो चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. याशिवाय अनुरागच्याच मनमर्झियामध्ये देखील विकीची भूमिका होती. त्यातील त्याचा तो वेगळा अंदाज आणि स्टाईल प्रेक्षकांना कमालीची भावली होती. अशाप्रकारे अनुरागसोबत विकीचे असणे हे त्याच्यासाठी खूप लकी आणि फायद्याचे ठरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com