विमानातील सूचनांचे कौशलने केले गाणे

टीम ई सकाळ
गुरुवार, 6 जुलै 2017

शास्रीय संगीताची बैठक असलेला संगीतकार अशी संगीतकार कौशल इनामदार यांची ओळख आहे. बालगंधर्व, अजिंठा अशा अनेक सिनेमांना त्यांनी दिलेलं संगीत गाजलं. त्यांचा कौशल कट्टा हा कार्यक्रमही ते करत असतात. काही कामानिमित्ताने ते विमानाने परगावी जाताना सीटमागे लिहिलेल्या सूचना त्यांनी वाचून दाखवल्या अन बघता बघता त्याचं गाणं झालं. 

पुणे: शास्रीय संगीताची बैठक असलेला संगीतकार अशी संगीतकार कौशल इनामदार यांची ओळख आहे. बालगंधर्व, अजिंठा अशा अनेक सिनेमांना त्यांनी दिलेलं संगीत गाजलं. त्यांचा कौशल कट्टा हा कार्यक्रमही ते करत असतात. काही कामानिमित्ताने ते विमानाने परगावी जाताना सीटमागे लिहिलेल्या सूचना त्यांनी वाचून दाखवल्या अन बघता बघता त्याचं गाणं झालं. 
 

 

A post shared by Kaushal Inamdar (@ksinamdar) on

कौशलने स्वत: हा व्हिडिओ करून सोशल साईटवर टाकला आहे. त्यात त्याने आधी या सूचनाा वाचून दाखवल्या आहेत. त्यानंतर या 24 मात्रा आहेत असं सांगत बघता बघता याचं गाणं तयार केलं आहे. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. संगीतकाराला जागोजागी गाणं सूचत असंतं म्हणतात. सप्तसूर त्याच्या मनात अखंड घोळत असतात. म्हणूनच संगीतकार कौशल यांना हे गाणं सुचलं असावं. 

Web Title: kaushal inamdar sings a song esakal news