बिग बी पुन्हा 'कौन बनेगा करोडपतीमध्ये'? प्रोमो व्हायरल

मनोरंजन (entertainment ) क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून प्रसिद्ध असणारा कौन बनेगा करोडपती एक वेगळा शो आहे.
Amitabh-Bachchan
Amitabh-Bachchan

मुंबई - मनोरंजन (entertainment ) क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून प्रसिद्ध असणारा कौन बनेगा करोडपती एक वेगळा शो आहे. त्याची लोकप्रियता बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या होस्टिंगमुळे आहे. याची कल्पना प्रेक्षकांना आहे. काही दिवसांपूर्वी बिग बी यांनी आपण यापुढे कौन बनेगा करोडपतीमध्ये काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता कौन बनेगा करोडपतीच्या 13 व्या सीझनचा प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यात अमिताभ बच्चन दिसत आहे. त्यावरुन या शो मध्ये अमिताभ पुन्हा हॉट सीटवर बसुन होस्टिंग करताना दिसणार का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (kbc 13 amitabh bachchan shares second promo clip of kaun banega crorepati yst88)

यंदाच्या (kaun banega corepati 13) शो मध्ये डिजिटल सिलेक्शन आणि स्क्रिनिंग पद्धत वापरण्यात आली आहे. आतापर्यत या शो चे 12 सीझन प्रदर्शित झाले आहे. त्या प्रत्येक सीझनला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एकदा या शोचं होस्टिंग किंग खान शाहरुख खाननं केलं होतं. मात्र त्याला अमिताभ बच्चन यांच्याएवढी लोकप्रियता मिळाली नव्हती. अमिताभ यांनी या शो ला मोठी उंची प्राप्त करुन दिली. त्यामुळे कौन बनेगा करोडपती या रियॅलिटी शो अजूनही प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा शो आहे.

आता या शो चा 13 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अमिताभ हा शो होस्ट करताना दिसणार आहे. शोच्या 13 व्या सीझनचा प्रोमो अमिताभ यांनी सोशल मीडियावरुन व्हायरल केला आहे. कौन बनेगा करोडपतीचा प्रोमो हा दोन प्रकारात व्हायरल करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात मेकर्सनं एका गावात शाळेची इमारत बांधण्याचे काम सुरु असल्याचे दाखवले आहे. त्या शाळेला पैशांची गरज आहे. आणि ती मदत मिळवण्यासाठी त्यांनी केबीसीमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. असे दाखविण्यात आले आहे.

Amitabh-Bachchan
...म्हणून इंडियन आयडॉलमध्ये परीक्षक नाही, सोनुनं सांगितलं कारण
Amitabh-Bachchan
सुत्रांनी माहिती दिली तर त्यात चूक काय? न्यायालयानं शिल्पाला झापलं

या सीरिजमध्ये ओमकार दास मानिकपुरी महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांची निवड कौन बनेगा करोडपतीच्या टीमनं केली आहे. आता गावकरी त्यांच्या शोची तयारी करताना दिसत आहे. जेणेकरुन ते जेव्हा अमिताभ यांच्या समोर हॉट सीटवर बसतील तेव्हा ते प्रश्नांची उत्तरं देतील. आणि आपल्याला शाळेसाठी पैसे मिळतील. आता या शॉर्ट फिल्मचा दुसरा भागही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com