एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde

एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा..

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. लोककला. नाटक, चित्रपट आणि मैत्रीचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. असाच एक किस्सा त्यांनी आज, १ एप्रिल रोजी समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा: जेनेलिया दिसणार 'या' अभिनेत्यासोबत,'जाने तू..'चा सिक्वल लवकरच..

१ एप्रिलला आपल्याकडे विशेष महत्व आहे. हा दिवस 'एप्रिल फूल' म्हणून ओळखला जातो. या दिवशी साधारण एकमेकांना 'फूल' म्हणजे मूर्ख बनवायचे असते. ही पाश्चिमात्य संकल्पना इंग्रजांमुळे भारतात रूढ झाली आहे. या दिवशी एखाद्या व्यक्तीसोबत अशी गम्मत करायची जी वास्तवात खोटी असली तरी समोरच्या व्यक्तीला मात्र खरी वाटायला हवी. तो जर फसला तर आपला एप्रिल फूल यशस्वी झाला असे म्हणतात. तरुण मुलांमध्ये आवर्जून अशा खोड्या केल्या जातात. असाच काहीसा रंजक अनुभव केदार शिंदे यांनी सांगितला आहे.

हेही वाचा: विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...

ही गोष्ट साधारण ३२ वर्षांपूर्वीची आहे. दोन वर्ष एका मुलीमागे फिरून शेवटी १ एप्रिल १९९१ रोजी केदार शिंदे यांना तिने होकार दिला होता. ती होकार देऊन निघून गेल्यावर आज एप्रिल फुल्ल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिने खरंच होकार दिला की आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपल्याला मूर्ख बनवले, असा संभ्रम केदार यांना पडला. याविषयी ते सविस्तर लिहितात की, 'दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर तीने (bela shinde) मला होकार दिला. (ankush chaudhari ) तेव्हा होता माझ्या सोबत. तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॅाटेलात चहा- बनमस्का खाताना, अचानक आठवलं "आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?" त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यात तीच्या घरच्या लॅंडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती. ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तीने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण.... ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून. आज १ एप्रिल २०२२.. घरातून निघण्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या आठवणीत रमलो. अंकुश तुला मीस केलं रे,' अशी पोस्ट केदार यांनी लिहिली आहे.

हेही वाचा: ट्रॅफिकला वैतागलात? हे पहा, भर ट्रॅफीकमध्ये 'प्रसाद-मंजिरी' करतायत डान्स

केदार शिंदे आपल्या कुटुंबाविषयी कायमच भरभरून बोलतात. पत्नी बेला शिंदे यांच्या सोबतच्या संसाराच्या आठवणीहि त्यांनी अनेकदा माध्यमांना सांगितल्या आहेत. गेल्याच वर्षी त्यांनी लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरी केला,. यावेळी त्यांनी काही भाऊक क्षण आणो फोटो शेअर केले होते. या लग्नात आदेश बांदेकर (aadesh bandekar) आणि सुचित्रा बांदेकर यांनी पुढाकार घेतला होता.

Web Title: Kedar Shinde Posted A Memories Of His Lovestory About April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top