Keerthy Suresh: टॉलीवूडच्या किर्तीनं चित्रपटाच्या टीमला वाटली सोन्याची नाणी! तिनं चक्क...

Article on journey of Keerthy Suresh on her Birthday
Article on journey of Keerthy Suresh on her Birthday Esakal

अभिनेत्री कीर्ती सुरेश ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. जरी ती साउथ चित्रपटात दिसत असली तरी तिचा चाहता वर्ग हा खुप मोठा आणि जगभर पसरला आहे. कीर्ती तिच्या 'दसरा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यात कीर्ती नानीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असुन आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान 'दसरा' च्या सेटवर अभिनेत्री कीर्तीने असं काही केलयं की तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Article on journey of Keerthy Suresh on her Birthday
Taapsee Pannu Trolled: 'हिंदू देवतांचा अपमान करतांना लाज नाय वाटत का?', Taapsee Pannuला नेटकऱ्यांनी झाडलं

कीर्ती सुरेश तिच्या 'दसरा' चित्रपटातील कामगिरीने इतकी खूश झाली की तिनं चक्क प्रत्येकी 10 ग्रॅमची 130 सोन्याची नाणी चित्रपटाच्या युनिट टिमला वाटली.

IANS मधील वृत्तानुसार, कीर्ती सुरेशला वाटले की तिने 'दसरा' मध्ये तिच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या लोकांसाठी काहीतरी खास करावं.

इतकेच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कीर्ती सुरेशही खुप भावुकही झाली होती. मग त्यानंतर तिने चित्रपटाच्या टीमला सोन्याची नाणी वाटण्याचा करण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार, कीर्ती सुरेशने चित्रपटाच्या टीमला 70-75 लाखांची सोन्याची नाणी वाटली.

Article on journey of Keerthy Suresh on her Birthday
Chetan Kumar: हिंदुत्वविरोधी ट्विट करणं अभिनेत्याला भोवलं! पोलिसांनी केली अटक

'दसरा' मूळतः तेलुगू भाषेतील चित्रपट आहे, पण तो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. कीर्ती सुरेश या चित्रपटात वेनेलाच्या भूमिकेत आहे.

श्रीकांत ओडेला दिग्दर्शित हा एक अॅक्शन अॅडव्हेंचर ड्रामा आहे. श्रीकांतने 'दसरा'ची कथा लिहिली आहे. चित्रपटाची कथा तेलंगणातील गोदावरीखानीजवळील सिंगरेनी कोळसा खाणीभोवती फिरते. 30 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

Article on journey of Keerthy Suresh on her Birthday
Pushpa 2: फायर है मैं! या दिवशी दिसणार पुष्पाची झलक.. निर्मात्यांनी दिली गुडन्यूज

लोक या चित्रपटाची तुलना अल्लू अर्जुनच्या पुष्पा आणि यशच्या केजीएफशी करत आहेत. दसरा या चित्रपटाला संतोष नारायण यांचे संगीत आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com