चित्रपट निर्माती आयशाचा जामीन न्यायालयानं ठेवला राखून

आयशानं जामीनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ayesha sultana
ayesha sultana Team esakal

मुंबई - चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाच्या (kerala high court) जामीन प्रकरणावर न्यायालयानं निकाल आता राखून ठेवला आहे. केरळ उच्च न्यायालयानं आयशाच्या अंतरिम जामीनावर निर्णय सुरक्षित ठेवला आहे. कोर्टाचे असे म्हणणे आहे, सीआरपीसीच्या (crpc) 41 व्या कलमानुसार आयशाला आता पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. तसेच जरी आयशाला (aisha sultana) अटक करण्यात आली असली तरी अंतरिम जामीनाच्या वेळी तिला मुक्त करण्यात यावे. आयशानं जामीनासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (kerala high court reserves order on filmmaker aisha sultana anticipatory bail plea)

काही दिवसांपूर्वी एका टिव्ही चॅनेलला (tv channal debet) वरील चर्चासत्रात आयशानं भाग घेतला होता. त्यात तिनं सांगितलं, लक्षव्दिपमध्ये पहिल्यांदा कोरोनाच्या केसेस नव्हत्या. आता मात्र दिवसाला शंभराहून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. प्रशासनानं प्रफुल्ल पटेल यांची बायो वेपन म्हणून नियुक्ती केल्याची टीका तिनं केली होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. याप्रकरणामुळे आयशा वादाच्या भोव-यात सापडली होती.

ayesha sultana
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत सरु आणि सुर्याची लगीनघाई
ayesha sultana
प्रिय'मनी' च्या पर्समध्ये शाहरुखनं दिलेले 300 रुपये

न्यायालयानं आयशाला अटकेपासून संरक्षणही दिले आहे. आयशाच्या त्या वक्तव्यामुळे भाजपनं तिच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. तिच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे त्या पक्षाच्या 12 नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे दिसून आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com