शाईफेक प्रकरणावर केतकी चितळेचं अनोखं उत्तर! त्रिशूळ दाखवून.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ketaki chitale answered to ink incidence she paints trishul on her blouse which was inked during arrest sharad pawar controversy

शाईफेक प्रकरणावर केतकी चितळेचं अनोखं उत्तर! त्रिशूळ दाखवून..

ketaki chitale : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. सध्या तीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. परंतु केतकीला जेव्हा अटक झाली तेव्हा काही अज्ञात लोकांनी केतकीवर शाइफेक केली होती. या घटनेला काही महीने उलटल्यानंतर केतकीने त्या शाइफेकीला सडेतोड उत्तर दिलं आहे. (ketaki chitale answered to ink incidence she paints trishul on her blouse which was inked during arrest sharad pawar controversy nsa95)

अभिनेत्री केतकी चितळे गेली काही वर्षे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. कधी निर्मात्यांशी वाद, कधी शेजऱ्यांशी तर कधी राजकीय विधाने. मध्यंतरी तिने एक कविता पोस्ट करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारी, व्यंग करणारी कविता पोस्ट केली होती. बघता बघता हे प्रकरण इतकं चिघळलं की केतकीला अटक करण्यात आली. यावेळी संतप्त जमावातील काही लोकांनी तिच्यावर शाइफेक केली. तेव्हा केतकीच्या ब्लाऊजवर ही शाई सांडली होती. त्याच आठवणी आणि तो ब्लाऊज घेऊन केतकीने यावर उत्तर दिलं आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून ती बोलती झाली आहे.

केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लाऊज रंगवताना दिसत आहे. जेव्हा शाईफेक करण्यात आली तेव्हाचे फोटो व्हिडीओच्या सुरुवातीला तिने दाखवले आहेत. त्यानंतर शाईचे डाग लागलेला ब्लाऊज ती एक पेंट बोर्ड वर लावते आणि त्यावर रंगकाम सुरू करते. अत्यंत सुबक आणि सुंदर रंगकाम करून केतकीने शाईने माखलेल्या ब्लाऊजवर त्रिशूळ रेखाटले आहे. शाइफेक करणाऱ्यांना अत्यंत मार्मिकपणे तिने आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. या व्हिडिओला तिने 'हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Web Title: Ketaki Chitale Answered To Ink Incidence She Paints Trishul On Her Blouse Which Was Inked During Arrest Sharad Pawar Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top