esakal | प्रसिध्द अभिनेता केविन क्लार्कचा मृत्यू, कारनं दिली धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Kevin Clark Passed Away

प्रसिध्द अभिनेता केविन क्लार्कचा मृत्यू, कारनं दिली धडक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - स्कूल ऑफ रॉक (School Of Rock )या चित्रपटामध्ये ड्रमर स्पॅजी मॅक्गीची (Spezzy )भूमिका करणारा प्रसिध्द अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याला एका कारनं धडक दिली. त्यात त्याचा मृत्यु झाला. पोलीस अधिका-यांचे म्हणणे आहे की, तो सायकलवरून चालला असताना एका चारचाकीनं त्याला मागून धडक दिली. ती धडक एवढी जोरदार होती की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. केविन हा एक लोकप्रिय अभिनेता होता. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणा-या या अभिनेत्याच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. (Kevin Clark Passed Away In A Road Accident Played Drummer Freddy Spezzy Jones In School Of Rock )

हॉलीवूडमधील (Hollywood) प्रख्यात अभिनेता म्हणून केविनची (Kevin Clark) ओळख होती. त्यानं वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या अपघाताचे वृत्त ऐकताच हॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, 32 वर्षीय केविन हा त्याच्या सायकलवरुन एका ठिकाणी जात होता. त्यावेळी त्याला एका चारचाकीनं जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात केविनचा जागीच मृत्यु झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना केविनचा मृतदेह त्या गाडीच्या खाली आढळून आला.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ

हेही वाचा: Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'

केविनची स्थिती पाहता त्याला घाईनं जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. केविनच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तो त्याच्या स्कूल ऑफ रॉक (School Of Rock ) या चित्रपटातील स्पॅजी मॅगी या भूमिकेसाठी प्रसिध्द होता. त्याची ती भूमिका लोकप्रिय झाली होती. त्यावरुन त्याला चाहते ओळखू लागले होते. केविन गेल्याचे कळताच जॅक ब्लॅक नावाच्या प्रसिध्द अभिनेत्यानं त्याला श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्यासाठी ही धक्कादायक बातमी असल्याचं त्यानं म्हटलं आहे.