Happy Birthday : 'या' सुपरस्टारचे बाबा आजही चालवतात सरकारी बस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

2017 मध्ये राधिका आणि यशने 'यश मार्ग'नावाची संस्था सुरू केली ज्यामार्फत ते समाजसेवा करतात. कर्नाटकच्या दुष्काळग्रस्त कोप्पाल जिल्ह्यात यश या संस्थेने 4 करोड रुपये खर्च करून गावकऱ्यांना पाणी मिळवून दिलं आहे. 

मुंबई :कन्नड अभिनेता नवीन कुमार गौडा उर्फ यश सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या KGF या सिनेमामुळे तो खुपच फेमस झाला आहे. या चित्रपटाने २०० कोटींचा बिझनेस केला होता. आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्नाटकमध्ये रॉकिंग स्टार नावाने प्रसिद्ध असलेल्या यशचा KGF सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सिनेमाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमात यशने दमदार संवाद आणि अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडलं आहे. आज आम्ही तुम्हाला या रॉकिंग स्टारच्या अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही याआधी कधी ऐकल्या नसतील.

Related image

यश आज भलेही सुपरस्टार असला तरी त्याचा जन्म एका सर्वसामान्य मध्यमवर्गात झाला. यशचे वडील KSRTC ट्रान्सपोर्ट सर्विसचे बस ड्रायव्हर होते. यश आज कोट्याधीश आहे, मात्र त्याचे वडील आजही बस चालवतात.

Image result for kgf movie hero yash hd images

यशची पत्नी राधिका पंडितही एक अभिनेत्री आहे. यशने टीव्ही मालिका नंदा गोकुलामधून आपल्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत त्याच्यासोबत राधिका पंडितही होती. यानंतर यशने मोगिना मानासू सिनेमात राधिकासोबत दुसऱ्यांदा काम केलं. यावेळी दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष दोघांनी आपलं नातं मीडियापासून लपवून ठेवलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यशच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने असले तरी तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा फार मोठा चाहता आहे. तसेच तो शाहरुख खानला स्वतःचा आयडॉल मानतो.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात साखरपुडा केला आणि बंगळुरूमध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे यशने त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला कर्नाटकातील सर्व जनतेला आमंत्रित केले होते.

Related image

यशच्या अभिनयाचं सर्वच स्तरावरून कौतुक होतं. मात्र यश बॉलिवूडमधील नवाजु्द्दीन सिद्दीकीचा मोठा चाहता आहे. तसेच तो किंग खान शाहरूख खानला स्वतःचा आयडियल मानतो. 

Related image

2017 मध्ये राधिका आणि यशने 'यश मार्ग'नावाची संस्था सुरू केली ज्यामार्फत ते समाजसेवा करतात. कर्नाटकच्या दुष्काळग्रस्त कोप्पाल जिल्ह्यात यश या संस्थेने 4 करोड रुपये खर्च करून गावकऱ्यांना पाणी मिळवून दिलं आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kgf chapter 1 star yash father working as a bus driver in ksrtc transport service