'केजीएफ' स्टार यश आणि राधिकाच्या मुलाचा आलिशान नामकरण सोहळा, नाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ होतोय ट्रेंड

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

यशचे चाहते त्याच्या मुलाला ज्युनिअर रॉकी देखील म्हणतात. मात्र यश आणि राधिकाने त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलंय त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.. 

मुंबई- 'केजीएफ' या सिनेमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता यश आणि त्याची पत्नी राधिकाने नुकताच त्यांच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पाडला. दोघेही दुस-यांदा आई-बाबा झाले आहेत. यशचं 'केजीएफ'मधील रॉकी हेपात्र प्रेक्षकांना प्रेमात पाडणारं होतं. म्हणूनंच यशचे चाहते त्याच्या मुलाला ज्युनिअर रॉकी देखील म्हणतात. मात्र यश आणि राधिकाने त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलंय त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.. 

हे ही वाचा: सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, हॉरर कॉमेडी दिसणार दोघांचा अनोखा अंदाज

अभिनेता यशने मुलाच्या नामकरण सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. २ मिनिट १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये यश-राधिका नामकरणाचे विधी करताना दिसत आहेत. तसंच या सोहळ्याचं पारंपरिक डेकोरेशनही यात पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना यशने लिहिलंय, '..आणि याच्या येण्याने आम्ही पूर्ण झालो.' २ तासांपूर्वी अपलोड केलेली ही पोस्ट आत्तापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत आहेत. व्हिडिओच्या शेवटी मुलाचं नावाची घोषणा देखील हटके पद्धतीने करण्यात आली आहे. 

Yash Shares Pic of 6 Month Old Son, Calls Him 'Buddy for Life'

यश आणि राधिकाला पहिली मुलगी आहे. जिचं नाव आर्या आहे. कन्नड फिल्मस्टार यशने २०१६ मध्ये कन्नड सिनेअभिनेत्री राधिकासोबत लग्न केलं होतं. दोघांनी बँगलोरमध्ये जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडला होता. इतकंच नाही तर यशने रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकला आमंत्रण दिलं होतं.  त्यांनंतर २०१८ मध्ये हे पहिल्यांदा आई-बाबा बनले. आता यश आणि राधिका मुलगी आर्या आणि मुलगा यशर्व यांचे पालक आहेत. यशचे चाहते आता त्याच्या आगामी 'केजीएफ २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit) on

kgf star yash and his wife radhika pandit reveal son name naming ceremony


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kgf star yash and his wife radhika pandit reveal son name naming ceremony