KGF Movie चा यश सहा महिन्यांत दुसऱयादा होणार बाप!

वृत्तसंस्था
Thursday, 27 June 2019

KGF: Chapter 1 चित्रपटामुळे देशभर प्रसिद्ध झालेला कन्नड सुपरस्टार यश आणि त्याची पत्नी अभिनेत्री राधिका पंडित यांच्या चाहत्यांसाठी गोड बातमी आहे. या सेलिब्रेटी दाम्पत्याच्या घरात दुसऱयांदा पाळणा हलणार आहे. यशच्या दुसऱया बाळाची आपण आई बनणार असल्याची बातमी राधिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

KGF: Chapter 1 चित्रपटामुळे देशभर प्रसिद्ध झालेला कन्नड सुपरस्टार यश आणि त्याची पत्नी अभिनेत्री राधिका पंडित यांच्या चाहत्यांसाठी गोड बातमी आहे. या सेलिब्रेटी दाम्पत्याच्या घरात दुसऱयांदा पाळणा हलणार आहे. यशच्या दुसऱया बाळाची आपण आई बनणार असल्याची बातमी राधिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

यश आणि राधिकाला सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले होते. आयरा यश असे कन्येचे नाव असल्याचे यश आणि राधिकाने नुकतेच जाहीर केले. या सेलिब्रेटी दाम्पत्याने बाळाच्या बारशाचा सोहळाही अगदी अलिकडेच घेतला. निमंत्रितांसाठी असलेल्या या सोहळ्याचा गोड व्हिडिओही यशने शेअर केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Round 2..  #radhikapandit #nimmaRP

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit) on

आयराचा जन्म 2 डिसेंबर 2018 चा. दुसऱया बाळाची बातमी देताना राधिकाने आयरा यशच्या फोटोंचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ भन्नाट आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमधून आयार चाहत्यांशी बोलते. ती म्हणते, मी आत्ताच काही एेकलं...माझ्या डॅडला (यश) स्पीड आहे, असं म्हणतात...पण इतका? थांबा...मी खूप लवकर सांगतेय का..? की सांगायला उशीर झालाय...? माझे पॅरेंटस् ना बेबी नंबर टू होणार आहे...!!

'स्वॅग से करेंगे उसका स्वागत,' असा व्हिडिओचा शेवट आयराने केला आहे. जगभरातील यशचे फॅन्स या व्हिडिओला व्हायरल करत आहेत. 

Image result for kgf yash and radhika with baby

यश सध्या KGF: Chapter 2 च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. KGF च्या पहिल्या भागाच्या तुफानी यशामुळे चाहते दुसऱया भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

यश आणि राधिका कन्नडमधील स्टार कपल आहे. टीव्ही सिरियलच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी चित्रपटांतून एकत्र काम केले. 2016 मध्ये यश आणि राधिका विवाहबद्ध झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KGF star Yash and Radhika Pandit expecting 2nd baby in just 6 months