KGF 2: रॉकी भाईची कमाई पाहून बाहुबली-भल्लाळदेव हँग! रेकॉर्ड ब्रेक

टॉलीवूडच्या केजीएफ चॅप्टर दोननं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.
KFG Movie news
KFG Movie newsesakal

KGF Chapter 2 box office collection Day 5: टॉलीवूडच्या केजीएफ चॅप्टर दोननं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. अल्पावधीतच या चित्रपटानं बॉलीवूडला भंडावून सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासुन टॉलीवूडचे जे चित्रपट (Tollywood News) प्रदर्शित झाले आहेत त्यात पुष्पा, आरआरआर, वल्लीमाई (KGF 2 Movie) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. थलापती विजयच्या बिस्टनं देखील कमाल केली आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीख चुकल्याचे (Entertainment News) दिसून आले आहे. केजीएफचा फटका हा सगळ्याच चित्रपटांना बसल्याचे दिसत आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात बंपर कमाई केली आहे. सगळीकडे थिएटर हाऊसफुल्ल आहेत. यश, संजय दत्त, रविना टंडन (Raveena Tondon) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची तुलना आता राजामौली यांच्या बाहुबली दोनशी होताना दिसत आहे.

केजीएफ 2 ची वाटचाल हजार कोटींकडे होत असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ साऊथच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये केजीएफचा बोलबाला दिसून येत आहे. थिएटरमध्ये गर्दी आहे. हाऊसफुल्लचे बोर्डही लागले आहे. कित्येक ठिकाणी केजीएफच्या टीमचं प्रमोशनही सुरु आहे. अशावेळी बाहुबलीचं एक हजार कोटींच्या कमाईचं रेकॉर्ड यशच्या केजीएफनं मोडल्याची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी राजामौली यांच्या आरआरआरला देखील केजीएफनं मोठी टक्कर दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांनी केजीएफची वाट पाहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळणार हे उघडच होते. मात्र तो एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल याची कल्पना केजीएफच्या टीमनं केली नव्हती. पाचव्या दिवशी या चित्रपटानं दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. हा भारतातल्या कमाईचा आकडा आहे. जगभरात देखील या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे.

केजीएफच्या दुसऱ्या चॅप्टरला पहिल्या दिवसापासूनच तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगभरातून या चित्रपटानं 522 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हा चित्रपट एक हजार कोटींची कमाई करेल असा अंदाज सिनेअभ्यासकांनी व्यक्त केला आहे. केजीएफच्या हिंदी व्हर्जननं 193 कोटी 99 लाख रुपयांची कमाई केली आहे. केजीएफनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. ते म्हणजे सर्वात कमी कालावधीत दोनशे कोटी रुपयांची कमाई करण्याची किमया केजीएफनं केली आहे. त्यामुळे येत्या आठवडयात आणखी काही नवे रेकॉर्ड सेट करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com