Khatron Ke Khiladi 11: अर्जुन विजेता ठरूनही नेटकऱ्यांचा दिव्यांकाला पाठिंबा

ट्रॉफीवर दिव्यांकाचा अधिकार असल्याचं नेटकऱ्यांचं मत
Khatron Ke Khiladi 11: अर्जुन विजेता ठरूनही नेटकऱ्यांचा दिव्यांकाला पाठिंबा

'खतरों के खिलाडी' Khatron Ke Khiladi 11 या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन नुकताच संपला आहे. अत्यंत साहसी स्टंट्समुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या सिझनचा विजेता अभिनेता अर्जुन बिजलानी Arjun Bijlani ठरला आहे. तर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी Divyanka Tripathi ही दुसऱ्या स्थानावर होती. अर्जुनसोबत दिव्यांका आणि विशाल आदित्य सिंग हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. ट्रॉफीसोबतच अर्जुनला बक्षीस म्हणून २० लाख रुपये आणि एक कार मिळाली. या सिझनचा विजेता अर्जुन ठरला असला तरी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिव्यांकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांच्या मते, दिव्यांका या सिझनची विजेती झाली पाहिजे होती. अर्जुनला मिळालेलं विजेतेपद अनेकांना खटकत असून त्यांनी सोशल मीडियावर खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे.

अंतिम फेरीत दिल्या गेलेल्या अत्यंत कठीण स्टंटमध्ये अर्जुनने अवघ्या २० सेकंदांनी दिव्यांकाचा पराभव केला. मात्र संपूर्ण सिझनमध्ये दिव्यांकाची खिलाडू वृत्ती पाहून नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.

Khatron Ke Khiladi 11: अर्जुन विजेता ठरूनही नेटकऱ्यांचा दिव्यांकाला पाठिंबा
'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

अर्जुनने 'मिले जब हम तुम', 'नागिन' आणि इतर काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही 'ये है मोहब्बतें' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. खतरों के खिलाडी या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी दिव्यांकाला १० लाख रुपये मानधन मिळत होतं. तर अर्जुन बिजलानीला प्रत्येक एपिसोडसाठी सात लाख रुपये मानधन मिळत होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com