'खतरो के खिलाडी सिझन 9'मध्ये थरारक स्टंट घेऊन येतील 'हे' सेलिब्रिटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

या सिझनमध्ये कोणकोण सेलिब्रिटी चेहरे दिसणार आहेत याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना आहेच. नवव्या सिझनमध्ये सहभागी होणार असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी काही नावं समोर आली आहेत. 

अॅक्शनपॅक रिअॅलिटी शो 'खतरो के खिलाडी'चा नववा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेलिब्रिटींच्या सहभागाने आणि त्यांना दिलेल्या थरारक स्टंट्सने हा शो प्रेक्षकांची नेहमीच उत्सुकता ताणून ठेवतो. रोहित शेट्टी या शोचा सूत्रसंचालक आहे. हा सिझन अर्जेंटिनामध्ये पार पडणार आहे.

या सिझनमध्ये कोणकोण सेलिब्रिटी चेहरे दिसणार आहेत याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना आहेच. नवव्या सिझनमध्ये सहभागी होणार असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी काही नावं समोर आली आहेत. 

‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधून ओळख निर्माण केलेला पुनीत पाठक 'खतरो के खिलाडी सिझन 9'मध्ये दिसणार आहे. ‘एबीसीडी’ या सिनेमातही त्याने भूमिका साकारली आहे. 

puneet pathak

‘बिग बॉस 11’ मधील सहभागी विकास गुप्ता ‘खतरों के खिलाडी’मध्येही सहभागी झाला आहे. ‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा शिंदेसोबत असलेल्या वादामुळे तो बिग बॉसमध्ये चर्चेत आला होता.

vikas gupta

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बहिण शमिता शेट्टी ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या शोमध्ये शमिता सहभागी झाली होती. 

shamita shetti

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर हिला ‘खतरों के खिलाडी’साठी आधी विचारलं गेलं होतं. मात्र इतर मालिकांमुळे तिने ऑफर नाकारली होती. पण आता ती सिझन 9 मध्ये स्टंट करताना दिसेल.

Avika gaur

कॉमेडीक्वीन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार आहे. याआधी दोघांनी ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

bharati and husband

वादग्रस्त क्रिकेटर श्रीसंथलाही यंदाच्या सिझन सहभागी झाला आहे. ‘झलक दिखला जा’ शोमध्येही सहभाग घेतला होता.

shreesant

‘दिल से दिल तक’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जास्मिन भासिन.

jasmin bhaisin

‘बहु हमारी रजनीकांत’ मालिकेत रोबोटची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिधिमा पंडीत.

ridhima pandit

‘नामकरण’ मालिकेतील लोकप्रिय चेहरा झैन इमाम ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार आहे. हा त्याचा पहिलाच रिअॅलिटी शो आहे. 

jain emam

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khatron ke khiladi season nine coming soon