अशोक सराफ यांना 'मामा' नाव कसं पडलं?, किस्सा सांगत अभिनेत्यानं उडवून दिली धमालKhupte Tithe Gupte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf

Khupte Tithe Gupte: अशोक सराफ यांना 'मामा' नाव कसं पडलं?, किस्सा सांगत अभिनेत्यानं उडवून दिली धमाल

Khupte Tithe Gupte: झी मराठी वाहिनीवर 'खुपते तिथे गुप्ते' सिझन २ लवकरच सुरु होत आहे. या सिझनचा पहिला एपिसोड शूट करण्यात आला आहे. सध्या या एपिसोडचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

या एपिसोडमध्ये मनोरंजन आणि राजकारण जे एरव्ही देखील हातात हात घालून वावरतात त्यांना एकत्र एका मंचावर पुन्हा आणलं गेलं. मनोरंजनसृष्टीतले दिग्ग्ज अभिनेते अशोक सराफ आणि राजकारणाते वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गेस्ट म्हणून पहिल्या भागात हजेरी लावली होती. (Khupte Tithe Gupte Ashok Saraf video viral)

अर्थात नेहमीप्रमाणेच अवधूत गूप्तेनं आपल्या खोचक प्रश्नांना व्यवस्थित मान्यवरांसमोर नेत हवं असलेलं उत्तर काढून घेतल्याचं दिसत आहे. यावेळी अवधूतनं अशोक सराफ यांना लोक मामा म्हणतात म्हणून वाईट वाटतं का?हे थेट विचारत यामागचा किस्साही काढून घेतला.

पण अशोक सराफच ते त्यांनी उत्तर देत अशी काही बॅटिंग केली की सेटवरच नाही तर तो व्हिडीओ पाहणाराही थक्क होईल. अर्थात त्यांनी मामा या नावामागचा किस्सा सांगितला तो देखील इंट्रस्टिंग आहे.

अशोक सराफ अवधूतच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले,''अर्थात मला मामा ही उपाधी मिळाली आहे,कुणी मामा बनवलं नाही ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

हे नाव कसं पडलं याचा किस्सा पुढे सांगत अशोक सराफ म्हणाले, ''एका सिनेमाच्या सेटवर एकदा कॅमेरामन त्याच्या छोट्या मुलीला घेऊन आला. त्यानं माझी त्या मुलीला ओळख करुन दिली,'हे आहेत अशोक मामा..', बरं ते झालं पण पुढे तो कॅमेरामन स्वतः मला मामा म्हणू लागला''.

''मग सेटवरचे लोकही मामा म्हणू लागले आणि मग ते नाव जगजाहीर झालं ते असं. पुढे आपल्या विनोदी शैलीत अशोक सराफ म्हणाले आता अनेकदा मुली देखील मामा म्हणायचे तेव्हा थोडं वाईट वाटायचं. शेवटी मी देखील माणूस आहे...''

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा नवा सिझन झी मराठी वाहिनीवर येत्या ४ जूनपासून सुरू होत आहे.