'खुपते तिथे गुप्ते'चा पहिलाच भाग वाजणार! कारण 'या' बड्या नेत्याची होणार एंट्री.. तुम्ही ओळखलंत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khupte tithe gupte avdhoot gupte marathi show first show guest is mns chief raj thackeray

'खुपते तिथे गुप्ते'चा पहिलाच भाग वाजणार! कारण 'या' बड्या नेत्याची होणार एंट्री.. तुम्ही ओळखलंत का?

Avdhoot Gupte show khupte tithe gupte : जय जय महाराष्ट्र माझा म्हणत पारंपरिक संगीत आणि फ्यूजन यांचं उत्तम समीकरण साधारणा गायक म्हणजे अवधूत गुप्ते. केवळ गायकच नाही तर संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्तम चौकस कलाकार म्हणून अवधूत गुप्तेकडे पाहिले जाते.

अवधूतचं गाणं आलं आणि आपण नाचलो नाही असं क्वचितच होतं. लवकरच अवधूत 'झी' मराठी वर एक दमदार मुलाखत घेऊन येत आहे. 'खुपते तिथे गुप्ते' असे या शो चे नाव असून हे या कार्यक्रमाचे दुसरे पर्व आहे. पण आता या शो ची बरीच चर्चा आहे कारण पहिल्याच भागात महाराष्ट्रातील एक मोठी राजकीय आसामी 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये हजेरी लावणार आहे.

(khupte tithe gupte avdhoot gupte marathi show first show guest is mns chief raj thackeray)

जवळपास १० वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचे आधीचे पर्व ही प्रचंड गाजले होते. अनेक दिग्गजांची मुलाखत त्यावेळी पाहायला मिळाली होती. आता दहा वर्षांनी हा शो परत एकदा येणार असून सगळ्यांची गुपित उलगडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

अवधूत गुप्ते हा गायक असला तरी त्याचे गोड आणि मिश्किल बोलणे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. तो जितका गोड आहे तितकंच अचूक ठिकाणी चिमटे काढायला पण त्याला बरोबर जमतं . त्यामुळे सर्वजन या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नुकतंच या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण झाले. यावेळी पहिल्याच भागात एका बड्या राजकीय नेत्याने हजेरी लावली. त्याचा एक व्हिडिओ 'झी मराठी' वाहिनीने शेयर केला आहे.

त्यांचा पेहराव हीच खरी त्यांची ओळख आहे. पायात लेदरची मोजडी, अंगावर खादीचा निळ्या रंगाचा ऊंची कुडता आणि वागण्यात रुबाब असा या नेत्याचा लुक आहे. हा असा राजकीय नेता आहे, ज्यांचे लाखों चाहते आहेत. कलाकारही आहे आणि त्यांच्या भाषणासाठी अलोट गर्दी होते.

या व्हिडिओ वर अनेकांनी कमेंट करत अगदी अचूक ओळखलं आहे. या व्हिडिओतील राजकीय नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. त्यामुळे 'खुपते तिथे गुप्ते' च्या पहिल्या भागात राज ठाकरे येणार असल्याने प्रेक्षक पाहिला भाग प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.