
Kiara Advani: 'नव्या नवरीचे नऊ दिवस संपले', कियारा कामावर परतली पण ट्रोल झाली..
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लव्ह कपल हे आजकाल लाइमलाईटमध्ये आहे. ते कुठेही दिसले तरी त्यांना पापराझी कॅमेऱ्यात कैद करतात. 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकलेल्या कियारा आणि सिद्धार्थची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते.
लग्नानंतरची घराबाहेरची झलक असो किंवा एअरपोर्टचे दृश्य, दोघेही प्रत्येकवेळी चर्चेत असतात. आता समोर आलेल्या नवीन व्हिडिओंमध्ये दोघेही एका अवॉर्ड शोमध्ये दिसत आहेत. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघेही स्टेजवर एकमेकांना मिठी मारताना दिसले. मात्र यावेळी कियाराच्या हातात ना लग्नाची अंगठी, ना सिंदूर किंवा मंगळसूत्र दिसले. मग नेटकरी कुठे शांत बसणार. त्यांनी कियाराची शाळा घेतली.
यावेळी सिद्धार्थ आणि कियारा वेगळे पोहोचले होते आणि दोघांना पाहून लोक अनेक प्रश्न विचारत आहेत आणि त्या दोघांना ट्रोल करताय.
7 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले होते. या लग्नात कुटुंबीय आणि नातेवाईकांव्यतिरिक्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती


तर दुसरीकडे कियारा लग्नाच्या धामधुमीनंतर कामावर परतली आहे. कियारा अडवाणीने बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होताना दिसते. ती कशासाठी शूटिंग करत आहे याची माहिती तिने दिली नाही. कामाबद्दल सांगायच झालं तर कियारा कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' आणि एस शंकर दिग्दर्शित राम चरणसोबत 'RC 15'साठी शूटिंग करत आहे.