
Kiara Advani: लग्नाच्या दिवशी अशी होती कियाराची अवस्था..म्हणाली,' पॅलेसचा 'तो' दरवाजा उघडला अन्..'
Kiara Advani: कियारा आडवाणी आता मिसेस सिद्धार्थ मल्होत्रा बनली आहे. तिनं लग्नातला आपला एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सिद्धार्थला जेव्हा पहिल्यांदा वराच्या रुपात पाहिलं तेव्हा काय वाटलं होतं यावर आता जाऊन कियारानं खुलासा केला आहे.
ती म्हणाली,''ती खूप खूश होती..ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच माझं लग्न होत होतं. आणि हेच फिलिंग मनात घेऊन मी सिद्धार्थच्या दिशेनं चालू लागले''.
त्याच्यानंतर काय घडलं याची झलक आपण सगळ्यांनीच कियारानं शेअर केलेल्या त्या लग्नातील व्हिडीओत पाहिली असे. कियारा डान्स करत सिद्धार्थच्या दिशेने आली आणि पुष्पहार त्याच्या गळ्यात घातल्यानंतर त्याला किसही केलं होतं.(Kiara Advani exprees her feeling she was emotional on wedding day when she saw sidharth malhotra)
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. अखेर दोघांनी आपल्या नात्यावर ऑफिशियली मोहोर उमटवली. आता एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान कियारानं सिद्धार्थला वराच्या रुपात पाहून तिला कसं वाटलं होतं याविषयी आपल्या मनातील भावना शेअर केल्या आहेत.
कियारा म्हणाली, ''मी खूप भावूक झाले होते..पण जसा तो दरवाजा उघडला..मी त्याला पाहिलं..तेव्हा आतून जाणवलं..आता माझं लग्न होतंय आणि तेच फिलिंग मनात घेऊन मी त्याच्या दिशेने चालू लागले. आणि जर तुमचं प्रेम ज्याच्यावर आहे त्याच्याशी तुमचं लग्न होत असेल तर असंच वाटेल ना?''
कियाराच्या वेडिंग व्हिडीओत पॅलेसमधला तो अवाढव्य दरवाजा उघडल्याक्षणी ती पाठमोरी दिसत आहे. त्यानंतर ती डान्स करत सिद्धार्थ मल्होत्राच्या दिशेने जाते. दोघं पुष्पहार घालून एकमेकांना घट्ट आलिंगन देतात आणि किस करतात.
व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'शेरशाह'चं गाणं देखील ऐकू येत आहे..जे त्यांच्या लग्नासाठी पुन्हा लिहिलं गेलं होतं.