कियारा अडवाणीने शेअर केला 'लक्ष्मी बॉम्ब'चा फोटो!

Kiara Advani shared her laaxmi bomb films first photo on social media
Kiara Advani shared her laaxmi bomb films first photo on social media

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'केसरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. आता अक्षय कियारा सोबत करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 

हा चित्रपट 2011 ला आलेल्या हॉरर कॉमेडी 'कंचना' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्या दिवशीचा फोटो कियाराने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर केला आहे.

या रिमेक चित्रपटाचे नाव आहे 'लक्ष्मी बॉम्ब'. या चित्रपटात अमिताभ बच्चनही प्रमुख भूमिकेत आहेत. दक्षिणेत 'कंचना'चे सर्व भाग प्रदर्शित केले गेले आहे. तसेच कियारा अडवाणी कबीर सिंह या चित्रपटात शाहिद कपूर सोबत दिसेल. हा चित्रपटही दक्षिणेतील अर्जुन रेड्डी चित्रपटाचा रिमेक आहे. कियारा अक्षय कुमार आणि करिना कपूर सोबत 'गुड न्युज' या चित्रपटातही काम करत आहे. एकुणच काय तर हे वर्ष कियारासाठी लकी ठरले आहे, असे म्हणायला हरकत नाही. 


 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Day of #LAAXMIBOMB @shabskofficial @akshaykumar #raghavalawrence @tusshark89 and the journey has just begun

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com