
Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आज दिल्लीत पडणार पार
सिद्धार्थ मल्होत्रा त्याची वधू कियारा अडवाणीसोबत दिल्लीला पोहोचला आहे. सिद्धार्थ आणि कियारा बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास जैसलमेरहून निघाले. विमानतळावर सिद्धार्थचे कुटुंबही दिसले आणि यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारी रोजी लग्न केले आणि कायमचे एक झाले.
या दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. ५ फेब्रुवारीलाच हे जोडपे जैसलमेरला पोहोचले होते आणि तेव्हापासून दोघांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले होते. आता लग्नानंतर दोघांनी रिसेप्शनची तयारी सुरू केली आहे.
सिद्धार्थ आणि कियारा आज दिल्लीत त्यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होस्ट करणार आहेत आणि संपूर्ण कुटुंब त्याच्या तयारीत व्यस्त आहे. हे जोडपे दोन रिसेप्शन आयोजित करणार आहेत, एक आज दिल्लीत आणि एक मुंबईत 12 फेब्रुवारीला.
आज दिल्लीतील रिसेप्शननंतर हे जोडपे उद्या म्हणजेच १० फेब्रुवारीला मुंबईला रवाना होतील. त्यानंतर मुंबईत स्टारस्डड रिसेप्शनचे आयोजन केले जाईल.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नानंतर पहिल्यांदा जैसलमेर विमानतळावर आणि नंतर गुरुवारी दिल्ली विमानतळावर दिसले. नववधू कियारा अडवाणीने कपाळावर सिंदूर आणि गुलाबी लग्नाच्या बांगड्या घातल्या होत्या. तसेच त्यांनी पापाराझींना मिठाईचे बॉक्स देखील दिले.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या आयुष्यातील खास दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नात कियारा एखाद्या परीकथेतील राजकुमारीसारखी दिसत होती, तर सिद्धार्थ मल्होत्रा राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. कियाराने बेबी पिंक लेहेंगा निवडला तर सिड गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेल्या ऑफ-व्हाइट शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता.