'इंदू की जवानी' थिएटरमध्येच होणार प्रदर्शित;किएराची मुख्य भूमिका

Kiara Advani's Indu Ki Jawani now released in theater
Kiara Advani's Indu Ki Jawani now released in theater

मुंबई - लक्ष्मी चित्रपटात झळकलेल्या किएरा अडवाणीची प्रमुख भूमिका असलेला 'इंदू की जवानी' हा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून चाहत्यांना उत्सुकता होती. किएराला आपल्या नव्या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.

किएराच्या नावावर अद्याप हिट चित्रपटाची नोंद झालेली नाही. अशावेळी तिच्या प्रदर्शित होणा-या 'इंदू की जवानी' च्या माध्यमातून तिला भविष्यातील आणखी काही प्रोजक्टस मिळण्याची शक्यता आहे. तिनं अक्षय कुमार सोबत लक्ष्मी नावाच्या चित्रपटात भूमिका केली. प्रेक्षकांनी त्याबद्दल तिचं कौतूकही केलं आहे.

येत्या 11 डिसेंबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्यांनाच वेगळ्या परिस्थितीतून जावे लागत आहे. त्याचा परिणाम चित्रपट क्षेत्रावरही झाला. मागील सहा महिन्यांहून अधिक काळ थिएटर बंद असल्याने निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढील संकट वाढले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

आता राज्यसरकारने योग्य ती काळजी घेऊन थिएटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप प्रेक्षकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे बिग बजेट चित्रपटांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा स्वीकार केला आहे. त्यावरुन मोठ्या संख्येने चित्रपट आणि वेबसीरिज प्रसिध्द झाल्या आहेत.

किएराने आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन  या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवातही केली आहे. या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास त्यात किएरा ही अभिनेता आदित्य सील याच्याबरोबर दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करत आहे.

अबीर सेनगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जियो नावाच्या चित्रपटातूनही झळकणार आहे. त्यात तिच्या जोडीला वरुण धवन दिसणार आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा गुलाबो सिताबो, जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना, सुशांत सिंगचा दिल बेचारा आणि अक्षय कुमारचा लक्ष्मी हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com