'Kick 2'ची ट्विटरवर हवा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

- किक या चित्रपटाला पाच वर्ष झाले आहेत.

- किक च्या सीक्वेलचा म्हणजे किक 2 ट्रेंड आपल्याला ट्वीटर वर बघायला मिळतो आहे

साजिद नडियादवाला दिगर्दशित आणि सलमान खान, जॅकलीन फर्नान्डिज अशी दमदार कास्ट असणारा 'किक' या चित्रपटाने आज पाच वर्ष पूर्ण केले आहेत. ही सामाजिक विषयावर भाष्य करणारी अॅक्शन कॉमेडी फिल्म प्रेक्शकांच्या मनात घर करून गेली होती.

रणदिप हूडा, मिथुन चक्रवर्ती, अर्चना पुरान सिंह अशा कलाकारांची साथ या सिनेमाच्या यशाच कारण आहे. यात तूरा खोवला तो नवाझुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या नकारात्मक भूमिकेने. त्याच्या चित्रपटातील हसण्याच्या पद्धतीची चर्चा आजही होते. त्याने किक मध्ये ओतलेल वेगळेपण प्रेक्शकांना फार भावल होत यात शंका नाही.

आज या चित्रपटाला पाच वर्ष झाले असून, किक च्या सीक्वेलचा म्हणजे 'किक 2' ट्रेंड आपल्याला ट्वीटर वर बघायला मिळतो आहे. किक 2, 2020 मध्ये आपल्याला भेटीला येणार आहे अशी चर्चा ट्वीटर वर होत आहे. किकला मिळालेल्या भरगोस प्रेमामुळे, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत म्हणून या सीक्वेलचे लिखाण साजिद नडियादवाला फार विचार पूर्वक करत आहे.

या सिनेमा मध्ये आपण सलमान खानला देवी प्रसादच्या भुमिकेत पून्हा बघू शकणार आहोत. किक या चित्रपटाने प्रेक्शकांच्या किक 2 बद्दलची उत्सुक्ता वाढवली आहे. आता दबंग 3 च्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेला सलमान किक 2 ही लवकरात लवकर आपल्या भेटीला येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kick 2 to release in 2020