बाबा रामरहीमवर अखेर किकू बोलला!

टीम ई सकाळ
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

बाबा रामरहीमचा दहशतवाद मोठा होता. द कपिल शर्मा शोमध्ये काही महिन्यांपूर्वी किकू शारदाने गुरमित रामरहीमवर किरकोळ टीका केली होती. त्याचा मोठा फटका किकूला बसला. एका रात्रीत त्याला मुंबईतून उचलून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याने माफी मागितल्यावर त्याला सोडण्यात आलं होतं. त्याचा मोठा निषेध झाला खरा. पण तोवर किकूने एक दिवसाची शिक्षा भोगली होती. आता बाबा रामरहीमला 20 वर्षांची शिक्षा झाल्यावर किकू काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण तो काही न बोलणे पसंत करत होता. आज अखेर मात्र त्याने आपलं मौन सोडलं. 

मुंबई : बाबा रामरहीमचा दहशतवाद मोठा होता. द कपिल शर्मा शोमध्ये काही महिन्यांपूर्वी किकू शारदाने गुरमित रामरहीमवर किरकोळ टीका केली होती. त्याचा मोठा फटका किकूला बसला. एका रात्रीत त्याला मुंबईतून उचलून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याने माफी मागितल्यावर त्याला सोडण्यात आलं होतं. त्याचा मोठा निषेध झाला खरा. पण तोवर किकूने एक दिवसाची शिक्षा भोगली होती. आता बाबा रामरहीमला 20 वर्षांची शिक्षा झाल्यावर किकू काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण तो काही न बोलणे पसंत करत होता. आज अखेर मात्र त्याने आपलं मौन सोडलं. 

मी केवळ एक रात्र तुरुंगात काढली. रामरहीमला आता 20 वर्षं तिथे काढावी लागणार आहेत. तुम्ही जसं काम करता, ते तुम्हाला भोगावं लागतं. आता तुरूंगात त्यांना कळेल जगणं काय असतं ते. अशा भाषेत किकूने बाबाच्या या नालायक कृत्याचा निषेध केला. महिलांवर अत्याचार केल्यानंतर बाबाला अटक झाली होती. त्यावेळी उसळलेल्या दंग्याबाबतही त्याने हळहळ व्यक्त केली. 

Web Title: Kiku sharda speakes about Baba Ramrahim esakal news