
किम पती कान्ये वेस्टसोबत घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. दोघांमध्ये काही गोष्टी व्यवस्थित नसल्याने दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत.
मुंबई- प्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशअनचे जगभरात चाहते आहेत. सोशल मिडियावर किमचे फोटो आणि व्हिडिओ खूपंच लोकप्रिय आहेत. आता किम कार्दशिअनच्या बाबतीत एक बातमी समोर येत आहे. किम पती कान्ये वेस्टसोबत घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. दोघांमध्ये काही गोष्टी व्यवस्थित नसल्याने दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत.
बर्थ डे स्पेशल: सिनेमांआधी किर्तनमध्ये गात होता दिलजीत दोसांज, 'उडता पंजाब'ने बदललं नशीब
रिपोर्ट्सनुसार, रिऍलिटी टीव्ही स्टार किम कार्दशिअन सध्या तिच्या ४ मुलांसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे तर तिचा पती रॅपर कान्ये वेस्ट सध्या वीयोमिंगमध्ये त्याच्या फार्म हाऊसवर राहत आहे. अशी चर्चा आहे की या दोघ्यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली असून आता हे लग्न आणि त्यांचं नातं शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलं आहे. दोघांचं २०१४ मध्ये लग्न झालं होतं. कान्ये वेस्ट घटस्फोट देण्याची तयारी करत आहे. कान्येच्या आधी किमने दोन वेळा लग्न केलं आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, किमने स्वतःच कान्येपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कान्येने आत्तापर्यंत हे स्पष्ट केलं नाही ती कधी घटस्फोट दाखल करणार आहे ते. गेल्या काही महिन्यांपासून किम आणि कान्ये दोघेही वेगळे राहत आहेत. आता सोशल मिडियावर देखील कित्येक महिन्यांपासून किम आणि कान्ये यांचे एकत्र फोटो दिसून येत नाहीयेत. कारण याआधी किम अनेकदा तिच्या पतीसोबत फोटो शेअर करत होती.
किमचं संपूर्ण कुटुंब सेलिब्रिटी आहे. किमचे वडिल रॉबर्ट कार्दशिअन अमेरिकेचे मोठे वकिल होते आणि तिची आई क्रिस जेनर देखील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. किम कार्दशिअनला तिच्या कर्व बॉडीसाठी ओळखली जाते. हॉलीवूडच्या टॉप मॉडेल्सपैकी किम एक आहे.
kim kardashian preparing to divorce kanye west