किंग खाननं केली भारताची स्तुती 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखनं एकदा भारतातील असहिष्णुतेवर वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली होती; मात्र आता त्याने देशाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय प्रेक्षक भलतेच खूश झालेत. टेड टॉक्‍स म्हणजेच "टेक्‍नोलॉजी, एन्टरटेनमेंट, डिझाईन' या विषयावरील एकमेव ऑनलाईन अमेरिकन व्हिडीओ लायब्रेरी. यांनी नुकतंच शाहरूख खानचं थॉट्‌स ऑफ ह्युमॅनिटी, फेम ऍण्ड लव्ह या विषयावरील व्याख्यान आयोजित केलं होतं.

त्या वेळी किंग खाननं देशाचे गोडवे गायले. तो म्हणाला की, "भारताव्यतिरिक्त जगात राहण्यासाठी दुसरी जागाच नाही.' जगभरातील प्रेरणादायी व्याख्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या टेड टॉक्‍समध्ये सहभागी होण्याची शाहरूखची ही पहिलीच वेळ होती. त्याच्या व्याख्यानाचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्याच्या व्याख्यानाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे किंग खान खूप खूश आहे. ते केवळ भाषण नव्हतं तर त्या अशा गोष्टी होत्या ज्यावर माझा विश्‍वास आहे आणि त्या आपल्या देशात शिकवल्या जातात.

माझ्या जीवनात मला भारताने हीच शिकवण दिली, असं शाहरूखने सांगितलं व पुढे म्हणाला की, "मला एवढं प्रेम मिळतंय याचं कारण आपल्या देशातील लोक खूप प्रेमळ आहेत. लोकांच्या प्रेमामुळेच मी स्टार झालो. भारतापेक्षा चांगला कोणताच देश नाही.'  

Web Title: King Khan praises India