किंग खान म्हणतोय "हे राम' 

संतोष भिंगार्डे
शनिवार, 7 एप्रिल 2018

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख सध्या त्याचा आगामी चित्रपट "झीरो'मुळे खूप चर्चेत आहे आणि एक चर्चा अशीसुद्धा आहे की. शाहरूख हल्लीच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनला भेटला आणि बराच वेळ त्याच्यासोबत त्याने व्यतित केला.

शाहरूखला कमल हसनचा "हे राम' चित्रपट खूप आवडतो आणि शाहरूख या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासंदर्भात बोलणी करण्यासाठी भेटला असल्याचे सूत्रांकडून समजतेय. किंग खान "हे राम'चा हिंदीत रिमेक करणार असून, स्वतः त्यात काम करणार असल्याचेही समजते आहे. याबाबत कमल हसन यांनी खुलासा केलाय. ते म्हणाले की, शाहरूख खानने त्यांचा चित्रपट "हे राम'चे हक्क विकत घेतले आहेत. त्याला माझा हा चित्रपट खूप आवडलाय. आता किंग खानने या चित्रपटाचे हक्क विकत घेतलेत म्हटल्यावर कदाचित तो या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवू शकतो. 

Web Title: king khan said hey ram he likes kamal hasan movie