
Kiran Mane: तिची आणि माझी मैत्री फक्त कॉन्टेन्टसाठी... म्हणत राखीच्या मैत्रीवर किरण मानेंनी सोडलं मौन
Kiran Mane News: गेली काही दिवस बिग बॉस फेम किरण माने यांची चर्चा जोरात आहे. बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) मुळे किरण माने हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.
किरण माने त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे, त्यांच्या परखड शैलीमुळे बिग बॉस मराठी ४ मध्ये सर्वात चर्चेत राहिलेले स्पर्धक होते. किरण माने आणखी एकदा चर्चेत आले ते म्हणजे राखी सावंत सोबतच्या मैत्रीमुळे.
नुकतेच कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२३ सोहळ्यादरम्यान किरण आणि राखी यांची भेट झाली. त्यावेळी किरण माने यांनी राखी आणि त्यांच्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या.
किरण माने लिहितात.."कलर्स मराठी ॲवाॅर्डस् सोहळ्यात राखी भेटली. 'बिगबाॅस'मध्ये झालेली माझी एक निखळ मैत्री ! शो मध्ये आम्ही दोघांनी फूल्ल धम्माल केली."
किरण माने पुढे सांगतात.. "पण आमची जोडी, आमचं मजेशीर फ्लर्टिंग, हे सगळं बाहेर प्रचंड पाॅप्यूलर झालंय, हे आमच्या गांवीही नव्हतं. बाहेर आल्यावर शेवटचे दहा बारा एपिसोड पाहून चकितच झालो... पण आमची मैत्री खरीखुरी होती.
फक्त काॅन्टेन्टसाठी नव्हती. याचा भक्कम पुरावा म्हणजे, ९ लाख रूपये असलेली बॅग तिच्याऐवजी मी घ्यावी यासाठी तिनं कळकळीनं, परोपरीनं प्रयत्न केले."
पुढे किरण माने राखीबद्दल सांगतात, "मला ते पैसे मिळावेत अशी तिची लै लै लै इच्छा होती. बॅग घेऊन बाहेर आल्यावरही ती तेजस्विनीला म्हणाली की हे पैसे किरणला मिळायला हवे होते.
अर्थात मी ती बॅग घेणार नव्हतो कारण मला सपोर्ट करणार्या, माझ्यासाठी व्होटिंग करणार्या माझ्या चाहत्यांचा मला अपमान करायचा नव्हता."
किरण माने शेवटी लिहितात, "पण राखीने माझ्यासाठी स्वत:च्या ९ लाख रूपयांचा त्याग करायची तयारी दाखवली होती, हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. सोपं नसतं हे गड्याहो ! मला बिगबाॅसनं खूप काही दिलं, त्याचबरोबर ही मोठ्या मनाची नितळ मैत्रीणही दिली...लब्यू राखी !"
किरण माने बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या मराठी सिनेमात झळकणार आहेत. याशिवाय महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात किरण माने झळकणार आहेत.