''Bigg Boss Marathi च्या आठवणीत मला अडकून पडायचं नाही..'',किरण माने पोस्ट करत स्पष्टच बोललेKiran Mane Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Mane Post

''Bigg Boss Marathi च्या आठवणीत मला अडकून पडायचं नाही..'',किरण माने पोस्ट करत स्पष्टच बोलले

Kiran Mane Post:बिग बॉस मराठी ४ चं पर्व संपलं असलं तरी घरातील सदस्य मात्र अजूनही चर्चेत असलेले पहायला मिळत आहेत. या पर्वाचा विजेता भले अक्षय केळकर झाला असेल तरी किरण माने,अपू्र्वा नेमळेकर यांचं हरणं आजही प्रेक्षकांच्या पचनी पडलेलं दिसत नाही.

किरण मानेंना तर आजही सोशल मीडियावर नेटकरी आमच्यासाठी विजेते तुम्हीच म्हणताना दिसतात. किरण माने देखील नेहमीच बिग बॉस मराठीची वाहवा करताना दिसतात पण असं अचानक काय घडलं की ते देखील आता म्हणतायत.'मला बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नाही...'

त्यांनी पोस्ट करत बिग बॉस शो विषयी बरंच काही लिहिलंय..ही पोस्ट आता चर्चेत आली आहे चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणालेत किरण माने.(Kiran Mane Post on Bigg Boss Marathi Show)

किरण माने सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतात. ते अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअरविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. बिग बॉस मराठीनंतर त्यांच्याकडे कामासाठी चिक्कार फोन येतायत..कामं मिळतायत हे त्यांनीच अनेकदा बोलून दाखवलंय पण मग असं असताना अचानक किरणा मानेंना बिग बॉसच्या आठवणी नकोशा का वाटतायत.

आता किरण मानेंची ही पोस्ट थोडीशी भावनिक आहे. जरी माने ह्यांना बिग बॉसच्या आठवणीत अडकून पडायचं नसलं तरी त्यांना थोडं वेगळं मांडायचं आहे यातनं.

ते म्हणालेत,..''मला बिगबाॅसच्या आठवणींत नको इतकं अडकून पडायचं नाही, पण एक मात्र खरं की काळजाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा लै लै लै भारी आठवणी दिल्यात बिगबाॅसनं... माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं... ''

''ज्यासाठी आयुष्यभर खपलो, ते १०० दिवसांत दिलं... भरभरून... आभाळ भरून मिळतंय अजूनही.संघर्षाचं सोनं होतंय... खूप कामं करतोय... नविन कामांसाठी रोज फोन येताहेत. महाराष्ट्रभर गांवोगांवी बोलावून लोक सत्कार करताहेत ते वेगळंच !! जादू केलीय जादू, त्या नादखुळा शंभर दिवसांनी !!!''

Love You Bigg Boss

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

किरण माने यांच्या पोस्टवर त्यांचे चाहतेही कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी पुन्हा एकदा किरण माने तुम्हीच आमच्यासाठी विनर आहात असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. किरण माने आता लवकरच महेश मांजरेकरांच्या सिनेमात दिसणार आहेत.

ते बिग बॉसमधील आपली मैत्रिण तेजस्विनी लोणारीसोबतही काम करणार आहेत तर अपूर्वा नेमळेकर सोबतही ते एक प्रोजेक्ट करतायत. त्यामुळे बिग बॉसनंतर त्यांच्या करिअरची गाडी सुसाट पळतेय हे नाकारून चालणार नाही.

अर्थात मानेंची ही नवी पोस्ट बिग बॉस शो चे आभार मानणारीच आहे.