किरण खेर कोकिलाबेनमध्ये दाखल, तीन तास चालली बोन सर्जरी

अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या आधारे किरण खेर यांना कर्करोग असल्याची माहिती दिली होती.
kirron Kher
kirron Kher Team esakal

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि चंदीगढ मधील भाजपाच्या खासदार किरण खेर (kirron kher )यांना आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (kokilaben hospital)दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची तीन तास बोन सर्जरी (Bone Surgery) सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे पती व प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या आधारे किरण खेर यांना कर्करोग असल्याची माहिती दिली होती. त्या लवकर ब-या व्हाव्यात म्हणून त्यांच्या चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करावी. असे आवाहनही अनुपम यांनी यावेळी केले होते. (kirron kher admitted hospital bone surgery kokilaben hospital suffering blood cancer)

किरण खेर (Kirron kher) यांच्यावर जवळपास तीन तास सर्जरी चालली. यावेळी हॉस्पिटलमध्ये अनुपम खेरही हजर होते. 68 वर्षीय किरण खेर या काही महिन्यांपासून कॅन्सरनं त्रस्त आहेत. ही गोष्ट गेल्या महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती. मात्र आपल्याला कॅन्सर असल्याची गोष्ट नोव्हेंबरमध्येच कळाली होती. असेही किरण यांनी एका पोस्टमधून सांगितले होते.

11 नोव्हेंबर 2019 मध्ये चंदीगढ येथे असणा-या घरात किरण खेर यांना दुखापत झाली होती. त्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. ज्यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांना मल्टिपल मायलोमा असल्याचे सांगण्यात आले. अनुपम यांचे चिरंजीव सिकंदर खेर (sikander kher)यांनीही किरण खेर यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

kirron Kher
Video: "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक
kirron Kher
बदनामीच्या आरोपावरून कमाल खानला सलमाननं खेचलयं कोर्टात

अनुपम (anupam kher) यांनी लिहिलेल्या पोस्ट मध्ये असे म्हटले होते की, किरण यांच्या प्रकृतीविषयी ज्या बातम्या प्रसिध्द होत आहेत त्यावरुन मला असे सांगायचे आहे की, त्यांना मल्टिपल मायलोमा नावाचा आजार झाला आहे. तो एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर आहे. सध्या त्या उपचार घेत आहे. त्या लवकरच या आजारातून बाहेर पडतील. अशी आशाही खेर यांनी यावेळी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com