Salman Khan: या तारखेला तुला मारणार... सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी.. तारीख पण ठरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan, salman khan death threat, kisi ka bhai kisi ki jaan, kisi ka bhai kisi ki jaan trailer

Salman Khan: या तारखेला तुला मारणार.. सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी.. तारीख पण ठरली

Salman Khan News: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमान खानला मारण्याचा मेल आलाय. या मेलमध्ये ३० एप्रिलला सलमान खानला मारण्याचा खुलासा केलाय. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

(kisi ka bhai kisi ki jaan fame bollywood superstar Salman Khan got a death threat again.. The date is also fixed)

फोन करणार्या व्यक्तीने सलमान खानला तो ३० तारखेला मारणार असल्याचे सांगितले.. तसेच त्याने स्वत:ची ओळख ही राॅकी भाई, गौरक्षक जोधपूर राजस्थानची सांगितली .. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ९ वा हा धमकीचा फोन आला होता.. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत

याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्वरक्षणासाठी सलमानने खास बुलेटप्रुफ गाडी परदेशातून मागवली होती. मात्र आता सलमानला पुन्हा एकदा धमकी आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीनंतर तपास सुरु केला आहे.

सलमानना यावेळी मिळालेल्या धमकीत हल्ल्याची तारीखही देण्यात आली आहे. सलमानला फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने सलमान खानला तो ३० तारखेला मारणार असल्याचे सांगितले आहे.

धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख ही रॉकी भाई, गौरक्षक जोधपूर राजस्थान अशी सांगितली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ९ वाजता हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.